Maharashtra Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात चौरंगी लढतीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 03:37 PM2019-10-04T15:37:05+5:302019-10-04T15:37:12+5:30

आमदार विजयराज शिंदे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, त्यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली असल्याचे दिसत आहे.

Maharashtra Election 2019: Signs of fierce contest in Buldana constituency | Maharashtra Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात चौरंगी लढतीचे संकेत

Maharashtra Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात चौरंगी लढतीचे संकेत

Next

- योगोश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले आहेत. परंतू, मतदारसंघ भाजपच्या वाट्याला न आल्याने विचलीत झालेले योगेंद्र गोडे यांनी ३ सप्टेंबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले विजयराज शिंदे देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. यामुळे बुलडाण्यात चौरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शक्तीप्रदर्शन करत १ सप्टेंबर रोजी त्यांनी अर्जही दाखल केला. भाजप-शिवसेना युती झाली असून बुलडाणा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. संजय गायकवाड यांना युतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु गेल्या पाच वर्षांपासून योगेंद्र गोडे यांनी भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून कार्य करत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. दरम्यान, ग्रासरूट लेव्हलवर त्यांनी काम केले होते.
मात्र, बुलडाणा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला न आल्याने त्यांनी २ आॅक्टोबर रोजी कार्यकर्त्यांसह भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी ३ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर दुसरीकडे शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने ही बाब माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, त्यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली असल्याचे दिसत आहे. चार आॅक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे संकेत मिळत आहे. यामुळे आता बुलडाणा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे संकेत सध्यातरी मिळत आहेत. खरे चित्र सात आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.


‘वंचित’ व एमआयएमकडूनही उमेदवार
वंचित बहुजन आघाडी व एमआयएमकडूनही बुलडाणा विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून मोताळा तालुक्यातील डॉ. तेजल काळे, तर एमआयएमकडून मोहम्मद सज्जाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
‘वंचित’ आणि एमआयएमच्या एंट्रीने विधानसभा निवडणूक रिंंगणात रंगत येणार आहे. असे असले तरी सात आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारिख आहे.
उमेदवारी अर्ज माघे घेण्याच्या दिवशी कोण माघार घेतो यावर बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होईल. तुर्तास चौरंगी लढतीचे चित्र येथे आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Signs of fierce contest in Buldana constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.