SSC Result 2019: बुलडाण्यात मुलीच अव्वल; जिल्ह्याचा निकाल ७७.०७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 04:04 PM2019-06-08T16:04:49+5:302019-06-08T16:23:16+5:30

बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ७७.०७ टक्के लागला असून, बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातदेखील मुलींनीच बाजी मारली आहे.

 SSC RESULT 2019: Girl's number one in Buldda; The result of the district is 77.07 percent | SSC Result 2019: बुलडाण्यात मुलीच अव्वल; जिल्ह्याचा निकाल ७७.०७ टक्के

SSC Result 2019: बुलडाण्यात मुलीच अव्वल; जिल्ह्याचा निकाल ७७.०७ टक्के

googlenewsNext
ठळक मुद्दे मुलींचा निकाल ८२.१२ टक्के, तर मुलांचा निकाल ७२.९६ टक्के लागला आहे. एकूण ३०८८३ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत.


बुलडाणा : मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्य उच्च माध्यमिक इयत्ता  दहावीचा आॅनलाईन निकाल शनिवार, ८ जून रोजी जाहीर झाला असून, दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ७७.०७ टक्के लागला असून, बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातदेखील मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ८२.१२ टक्के, तर मुलांचा निकाल ७२.९६ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकूण ४० हजार ७०७ नोंदणीकृत परीक्षार्थी विद्यार्थी होते. त्यापैकी ४० हजार ७२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७८६९ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत, १३१४३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ८४११ द्वितीय श्रेणीत, तर १४६० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ३०८८३ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक ९०.१५ टक्के निकाल सिंदखेड राजा तालुक्याचा, तर सर्वात कमी निकाल जळगाव जामोद तालुक्याचा ६८.२९ टक्के लागला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये बुलडाणा-८३.६५ टक्के, मोताळा, ७४.७५ टक्के, देऊळगाव राजा ८४.०९ टक्के, लोणार ७२.६५ टक्के, मेहकर ८१.१६ टक्के, शेगाव ७२.१७ टक्के, नांदुरा ६७.८३ टक्के, मलकापूर ७५.९४ टक्के, संग्रामपूर ६९.७९ टक्के निकाल लागला आहे.

Web Title:  SSC RESULT 2019: Girl's number one in Buldda; The result of the district is 77.07 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.