विद्यार्थ्यांनी केला प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:57 AM2017-10-16T00:57:48+5:302017-10-16T00:58:06+5:30
डोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी १४ ऑक्टोबर रोजी दिवाळीला फटाके न फोडण्याची शपथ घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी १४ ऑक्टोबर रोजी दिवाळीला फटाके न फोडण्याची शपथ घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.
दिवाळीदरम्यान फटाक्यांसाठी घरून मिळणारे पैसे बचत करून दिवाळीनंतर गरीब व गरजू शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य देण्याचा निर्धारही विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या ४00 विद्यार्थ्यांनी यावेळी केला. यंदा सर्व विद्यार्थ्यांनी कोणतेही प्रदूषण पसरविणारे फटाके फोडू नये व सदर पैशांचा सदुपयोग समाजकार्यासाठी करण्याचे आवाहन मु ख्याध्यापक आत्माराम दांदडे, हेमंत जोशी यांनी शिक्षक व विद्यार्थी यांना केले. यावर शाळेच्या दिवाळी सुटीच्या शेवटच्या दिवशी या शाळेचे शिक्षक संजीव भारते, बंडू पांडव, गजानन भगत, अभिजित दिनोरे, गौतम सदावर्ते, श्याम पांडव व माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी आम्ही साजरी करू म्हणून शपथ घेतली. तसेच वाचलेल्या पैशांतून होतकरू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य देण्याचा निर्धार केला.