IPL 2024 SRH vs MI: लक्ष्य २७८! हार्दिकमुळे मुंबईची झाली धुलाई; इरफान पठाणने सांगितली घोडचूक

IPL 2024 SRH vs MI Live: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर धावांचा डोंगर उभारला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:54 PM2024-03-27T21:54:52+5:302024-03-27T21:55:00+5:30

whatsapp join usJoin us
Ipl Match 2024 live score SRH vs MI Mumbai Indians captain Hardik Pandya has asked why Irfan Pathan didn't give an early over to Jasprit Bumrah | IPL 2024 SRH vs MI: लक्ष्य २७८! हार्दिकमुळे मुंबईची झाली धुलाई; इरफान पठाणने सांगितली घोडचूक

IPL 2024 SRH vs MI: लक्ष्य २७८! हार्दिकमुळे मुंबईची झाली धुलाई; इरफान पठाणने सांगितली घोडचूक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 SRH vs MI Live Updates In Marathi | हैदराबाद: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आठवा सामना ऐतिहासिक ठरला. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरूद्ध धावांचा डोंगर उभारला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने धावांचा डोंगर उभारला. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन या त्रिकुटाने हार्दिकसेनेची चांगलीच धुलाई केली. विशेष बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या करून हैदराबादच्या संघाने इतिहास रचला. मुंबईसमोर विजयासाठी तब्बल २७८ धावांचे आव्हान आहे. यजमान हैदराबादने निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा केल्या. (IPL 2024 News) 

मंयक अग्रवाल (११) स्वस्तात बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मोर्चा सांभाळला. त्यांनी स्फोटक खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. हेडने ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत ६२ धावा केल्या. तर अभिषेक शर्माने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २३ चेंडूत ६३ धावा कुटल्या. एडन मार्करम आणि हेनरिक क्लासेन यांनी देखील हात साफ केले. एडन मार्करमने १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या, तर हेनरिक क्लासेनने ७ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ८० धावा कुटल्या आणि ऐतिहासिक धावसंख्या उभारली. 

मुंबईकडून सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. क्वेना मफाकाने ४ षटकांत तब्बल ६६ धावा दिल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने ४ षटकांत ४६ धावा देत १ बळी घेतला. तर जसप्रीत बुमराहने पहिले दोन षटक चांगले टाकले आणि ४ षटकांत ३६ धावा दिल्या मात्र त्यालाही बळी घेता आला नाही. गेराल्ड कोएत्झीने ४ षटकांत ५८ धावा देऊन १ बळी घेतला, तर पियुष चावलाच्या २ षटकांत यजमानांनी ३४ धावा खेचल्या. शम्स मुलाणीच्या २ षटकांत हैदराबादने ३३ धावा काढल्या. 

मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई झाली त्याला कर्णधार हार्दिक पांड्या जबाबदार असल्याचे माजी खेळाडू इरफान पठाणने म्हटले. खरं तर हार्दिकने जसप्रीत बुमराहला वगळून पदार्पण करत असलेल्या गोलंदाजाला पहिले षटक दिले. याचा दाखला देत इरफान म्हणाला की, हार्दिक पांड्याची कॅप्टनसी अगदी सामान्य राहिली. स्फोटक खेळी सुरू असताना त्याने बुमराहला खूप वेळ दूर ठेवले, त्याला षटक का दिले नाही हे मला समजत नाही. 

हैदराबादचा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड,  भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय आणि जयदेव उनाडकट. 

मुंबईचा संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित  शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नमन धीर, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, शम्स मुलाणी, क्वेना महाका.

Web Title: Ipl Match 2024 live score SRH vs MI Mumbai Indians captain Hardik Pandya has asked why Irfan Pathan didn't give an early over to Jasprit Bumrah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.