आयसीआयसीआय - व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर, दीपक कोचर यांना हजर राहण्यासाठी समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 07:00 PM2019-04-23T19:00:12+5:302019-04-23T19:01:00+5:30
३ मे रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले आहे.
मुंबई - आयसीआयसीआय - व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर यांना ईडी अधिकाऱ्यांसमोर ३ मे रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले आहे. तर चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दीर राजीव कोचर यांना देखील मुंबईतील तपास कार्यालयात ३० एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले आहेत.
गैरव्यवहार करून कर्ज दिल्या प्रकरणावरून आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांच्या निवासस्थानांवर अंमलबाजवणी संचालनालय (ईडी) गेल्या काही महिन्यांपासून तपास करत आहे. मागील महिन्यात यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले आणि त्यातील काही पैसे त्याच्या पतीला देण्यात आले होते, असा त्यांच्यावर ठपका आहे.
चंदा कोचर यांचे हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांना मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मागच्याच महिन्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला होता.
Enforcement Directorate sources: Chanda Kochhar summoned to appear before ED officials on May 3 in connection with the ICICI-Videocon case. Her husband Deepak Kochhar and brother-in-law Rajiv Kochhar also summoned to appear before the Mumbai Investigation office on 30th April. pic.twitter.com/rXHFVAq05r
— ANI (@ANI) April 23, 2019
आयसीआयसीआय - व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर यांना ईडी अधिकाऱ्यांसमोर ३ मे रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले https://t.co/fUWIufFuiq
— Lokmat (@MiLOKMAT) April 23, 2019