अमळनेर तालुक्यातील टंचाईग्रस्त शिरूड गावाला मिळणार शुद्ध व थंड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 05:54 PM2017-12-21T17:54:52+5:302017-12-21T17:59:25+5:30

सरपंचपदावरून दूर झाल्यानंतरही महेंद्र पाटील यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला

Pure and cold water will be given to the drought-affected city in Amalner taluka | अमळनेर तालुक्यातील टंचाईग्रस्त शिरूड गावाला मिळणार शुद्ध व थंड पाणी

अमळनेर तालुक्यातील टंचाईग्रस्त शिरूड गावाला मिळणार शुद्ध व थंड पाणी

Next
ठळक मुद्देशेड उभारून पाणी शुद्ध व थंड करण्याचा प्रकल्प केला तयारएटीएम मशिनद्वारे मिळणार १ ते ५ लिटरपर्यंत शुद्ध पाणी१० रुपयात नागरिकांना मिळणार २० लिटर शुद्ध पाणी

आॅनलाईन लोकमत
अमळनेर,दि.२१ - सरपंचपदावरून दूर झाल्यानंतरही अमळनेर तालुक्यातील टंचाईग्रस्त शिरुड गावाला दिलेला शब्द माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी पाळला. त्यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांसाठी शुद्ध आर.ओ. आणि थंड पाणी घरपोच सेवा सुरू केली आहे.
शिरुड येथे क्षारयुक्त व अशुद्ध पाण्यामुळे काही ग्रामस्थांना पोटाचे विकार सुरु झाले होते. त्यामुळे गावाला शुद्ध पाणी मिळवून टंचाई दूर करण्याचे आश्वासन तत्कालिन सरपंच महेंद्र पाटील यांनी दिले होते. त्यानंतर ते पदावरून दूर झाले. मात्र भगवान महावीर गोशाळा व प्रथमेश इंटरप्रायजेसच्या माध्यमातून गावातील नागरिकांसाठी जलतृप्ती योजना राबवून आरोग्यदायी पिण्याचे पाणी एटीएम द्वारे घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. गुरुवार २१ पासून या प्रकल्पास सुरवात होणार असल्याची माहिती भगवान महावीर गो-शाळेचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली
गावातील नागरिकांसाठी शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी प्रथमेश इंटरप्रायजेस च्या माध्यमातून गावातच असणाºया भगवान महावीर गोशाळा येथील आवारात शेड उभारून पाणी शुद्ध व थंड करण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. दत्त सेवा आश्रमात असणाºया बोरवेलचा उपयोग करून पाणी शुद्ध व थंड करण्यात येणार आहे. ते नागरिकांना १० रुपयात २० लिटर शुद्ध पाण्याचा जार घरपोच पुरविण्यात येणार आहे. तर महावीर गो-शाळेत येणाºया नागरिकांना ८ रुपयात २० लिटर पाण्याचा जार मिळणार आहे. वॉटर मोबाईल व्हॅन द्वारे घरपोच पाणी वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच एटीम मशीनचा उपयोग करूनही पाणी वितरित करण्यात येणार असून १ रुपयांचा कॉइन टाकून १ लिटर शुद्ध पाणी तर ५ रुपयात ५ लिटर पाणी एटीएम द्वारे मिळणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांकडे काही कार्यक्रम व विविध कार्यक्रमासाठी १ हजार रुपयात १ हजार लिटर पाणी घरपोच पोहचविण्यात येणार आहे. शाळा व धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० पैसे लिटर प्रमाणे पोहच करण्यात येणार आहे. यामुळे टंचाई काळातही गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. यावेळी गोशाळेचे सचिव चेतन शहा, संचालक सतीश वाणी, डी.ए.धनगर, अमित अहिरे, के.एस.महाजन, भावडू महाजन उपस्थित होते.

Web Title: Pure and cold water will be given to the drought-affected city in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.