कोल्हापूर : गरीबांबद्दल कळवळा का नाही आला?, पालकमंत्री पाटील, आ. महाडिक यांच्यावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:42 PM2018-04-11T16:42:29+5:302018-04-11T16:42:29+5:30

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गोरगरीबांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली उध्दवस्त केली ,फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांना कळवळा का आला नाही, असा सवाल बुधवारी महानगरपालिकेतील कॉँग्रेस आघाडीतर्फे उपस्थित करण्यात आला. श्रीमंत कोल्हापूर करायला निघालेल्या पालकमंत्र्यांनी श्रीमंत लोकांसाठी किमान कोल्हापूर शहराची वाट लावू नये असे आवाहनही आघाडीने केले आहे.

Kolhapur: Why did not you feel sorry for the poor, the Guardian Minister, Patil, Comment on Mahadik | कोल्हापूर : गरीबांबद्दल कळवळा का नाही आला?, पालकमंत्री पाटील, आ. महाडिक यांच्यावर टीका

कोल्हापूर : गरीबांबद्दल कळवळा का नाही आला?, पालकमंत्री पाटील, आ. महाडिक यांच्यावर टीका

Next
ठळक मुद्देगरीबांबद्दल कळवळा का नाही आला?पालकमंत्री पाटील, आ. महाडिक यांच्यावर टीका

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गोरगरीबांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली उध्दवस्त केली, फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांना कळवळा का आला नाही, असा सवाल बुधवारी महानगरपालिकेतील कॉँग्रेस आघाडीतर्फे उपस्थित करण्यात आला. कोल्हापूर श्रीमंत करायला निघालेल्या पालकमंत्र्यांनी श्रीमंत लोकांसाठी किमान कोल्हापूर शहराची वाट लावू नये असे आवाहनही आघाडीने केले आहे.

मंगळवारी मंत्रालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत गांधीनगर रस्त्यावरील अवैध बांधकामाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याने त्यावर कारवाई कर नये, असे राज्य सरकारने निर्देश दिल्यामुळे त्याची प्रतिक्रिया महानगरपालिका वर्तुळात उमटली.

या निर्णयाचा कॉँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत तीव्र शब्दात निषेध केला आहे. महापौर स्वाती यवलुजे, शिक्षण मंडळ सभापती वनिता देठे, महिला बाल कल्याण सभापती सुरेखा शहा, गटनेते शारंगधर देशमुख, माजी सभापती संदीप नेजदार, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, संजय मोहिते यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील व आमदार महाडिक यांना श्रीमंतांना एक आणि गरीबांना एक न्याय द्यायचा आहे. एकीकडे शहरात गरीबांवर कारवाई झाली त्यावेळी ही मंडळी कुठे होती. त्यावेळी त्यांना कळवळा आला नाही. गांधीनगर रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या श्रीमंतांची बाजू घेऊन मताच्या राजकारण करताना मात्र कळवळा आला. नियम न पाळता जर इमारती बांधल्या असतील तर त्यांच्यावर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यांना संरक्षण देण्याची गरज नाही, अशी अपेक्षा शारंगधर देशमुख यांनी व्यक्त केली.

येथून पुढे शहरात अतिक्रमण काढण्याची विना परवाना बांधकामे तोडण्याची मोहिम मनपा प्रशासनाने हाती घेतली तर पक्ष म्हणून नाही तर नगरसेवक म्हणून रस्त्यावर उतरुन ही कारवाई बंद पाडू असा इशारा देशमुख यांनी दिला. जोपर्यंत गांधीनगर रस्यावरील अवैध बांधकामे तोडली जात नाहीत तोपर्यंत शहरात कारवाई करु दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस संरक्षण नाकारणाऱ्या पोलिस प्रशासनाचाही निषेध करण्यात आला.

 

 

Web Title: Kolhapur: Why did not you feel sorry for the poor, the Guardian Minister, Patil, Comment on Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.