पेट्रोल-डिझेल दरवाढीने बिघडले सामान्यांचे बजेट; बसभाडेही महागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 05:59 AM2018-09-04T05:59:51+5:302018-09-04T06:00:17+5:30
पेट्रोल व डिझेलच्या दराने सोमवारी नवा उच्चांक गाठला. राज्याच्या अनेक भागांत पेट्रोल ८७ रुपये २३ डिझेल ७५.७० रुपयांवर पोहोचले. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई : पेट्रोल व डिझेलच्या दराने सोमवारी नवा उच्चांक गाठला. राज्याच्या अनेक भागांत पेट्रोल ८७ रुपये २३ डिझेल ७५.७० रुपयांवर पोहोचले. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. धान्ये, खाद्यान्न, भाजीपाला, प्रवास सारेच महागल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे.
तिन्ही तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात ३१ व डिझेलच्या दरात ३९ पैसे प्रति लीटरची वाढ केली. सलग १0 दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे. खाद्यान्न, धान्य, भाजीपाला यांची वाहतूक डिझेलच्या वाहनाने होत असते. ही वाहतूक करणाऱ्या मालवाहतूकदारांनी डिझेल ६८ रुपये प्रति लीटरवर असताना मालभाड्याचा दर निश्चित केला होता. डिझेल ७४ रुपये होईपर्यंत आम्ही सहन करू, पण त्यानंतर भाडेदरात वाढीचा विचार करावा लागेल, असे मालवाहतूकदारांनी ‘लोकमत’ला सांगितले होते.
आता तर डिझेलने ७५ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे मिनी टेम्पोसाठी मालवाहतूकदार प्रति किमी ५ रुपयांची दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. या मिनी टेम्पोद्वारे मुख्यत: भाजीपाल्याची वाहतूक होते. त्यामुळे भाजीपाला किलोमागे किमान ६ ते ८ रुपये किलोने महागेल.
महाराष्टÑात डाळी वगळता, गहू, तांदूळ व तेल या धान्यांची आवक अन्य राज्यांतून होते. सुमारे ५०० ते ८०० किमी किंवा त्याहून अधिक अंतरावरून येणाºया या ट्रक्सच्या वाहतूक खर्चात डिझेल दरवाढीमुळे प्रति फेरी किमान २५०० ते ३००० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रक वाहतूकदारही भाडेदर वाढवतील आणि त्यामीळे धान्ये व किराण्याच्या किमती किलोमागे १० ते १२ रुपयांनी भडकतील.
ड्रायव्हर्सच्या नोक-या संकटात
शहरी व निमशहरी भागांत बहुतांश खासगी वाहने डिझेलवरील आहेत. दरवाढीमुळे वाहनमालकांनी गाड्या बाहेर न काढण्याचा निर्णय घेतल्यास ड्रायव्हरच्या नोकºया धोक्यात येण्याची भीती आहे.
दुचाकीस्वारांना १३० कोटींचा भुर्दंड
राज्यात रोज जवळपास दीड कोटी लिटर पेट्रोलची विक्री होते. त्यापैकी ८० टक्के पेट्रोल दुचाकीसाठी वापरले होते. महिनाभरातील पेट्रोल दरवाढीचा विचार केल्यास दुचाकीस्वारांच्या खिशाला किमान १३० कोटींचा भुर्दंड बसला आहे.
बसभाडेही महागणार
गणेशोत्सवासाठी अनेक जण गावी जातात. रेल्वेगाड्यांना गर्दी असल्याने ते लक्झरी बसेसचा आसरा घेतात. या बसगाड्या डिझेलवर धावतात. डिझेल दरवाढीमुळे बसगाड्यांच्या खर्चात प्रति किमी ७० ते ९० रुपये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम तिकीटदरांवर होईल. कोकणात जाणाºयांना गणोशोत्सवाच्या काळात एका तिकिटासाठी दोन हजारांवर रुपये मोजावे लागतील.