Mumbai CST Bridge Collapse : युनायटेड काँग्रेसने केले आयुक्तांना लक्ष्य; महापालिकेसमोर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 03:47 PM2019-03-16T15:47:41+5:302019-03-16T15:48:46+5:30
आता युनायटेड काँग्रेसने पालिका आयुक्त अजोय मेहता यांना लक्ष्य करत पालिकेबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन सुरु केले आहे.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेरील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा मुंबईकरांचा नाहक बळी गेला. मात्र, या दुर्घटनेनंतर राजकीय पक्षांच्या राजकरणाने देखील जोर धरला आहे. बृहन्मुंबई महापालिकेने हा पूल आमच्या अखत्यारीत असल्याचं स्पष्ट केलं असून कालच या दुर्घटनेला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आता युनायटेड काँग्रेसने पालिका आयुक्त अजोय मेहता यांना लक्ष्य करत पालिकेबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन सुरु केले आहे.
या दुर्घटनेबाबत जाब विचारण्यासाठी पलिकबाहेर युनायटेड काँग्रेसने घोषणाबाजी सुरु केली असून त्यांना आयुक्त अजोय मेहता यांची भेट घ्यायची आहे. मात्र, आयुक्त मंत्रालयात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Mumbai CST Bridge Collapse: स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाईची हकालपट्टी, काळ्या यादीत टाकणार
Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई https://t.co/3oB5SsgXG5
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 15, 2019