Mumbai coastal road tunnel: कोस्टल रोडच्या टनेलमध्ये मोबाइल नेटवर्कच नाही, आपत्कालीन सेवेचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:28 AM2024-04-24T11:28:27+5:302024-04-24T11:29:12+5:30

Mumbai coastal road tunnel: ३.५ किमी लांबीच्या या टनेलमध्ये नेटवर्क अँटिना बसविण्याचं काम अद्याप सुरू आहे. ते पूर्ण झालेलं नाही. येत्या १५ मे पर्यंत ते पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. 

no mobile network in the coastal road tunnel what about emergency services | Mumbai coastal road tunnel: कोस्टल रोडच्या टनेलमध्ये मोबाइल नेटवर्कच नाही, आपत्कालीन सेवेचं काय?

Mumbai coastal road tunnel: कोस्टल रोडच्या टनेलमध्ये मोबाइल नेटवर्कच नाही, आपत्कालीन सेवेचं काय?

मुंबई-

मुंबईतील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राइव्ह अशी एक मार्गिका ११ मार्च रोजी खुली करण्यात आली. या मार्गिकेवर असलेल्या भुयारी मार्गात मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याची तक्रार आता समोर आली आहे. 

कोस्टल रोडच्या या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ नक्कीच वाचत आहे. यामुळे मुंबईकरांच्या वेळेची बचत तर होतेय. पण काम १०० टक्के पूर्ण झालेलं नसतानाही उदघाटनाची घाई का केली गेली असाही सवाल आता उपस्थित केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार ३.५ किमी लांबीच्या या टनेलमध्ये नेटवर्क अँटिना बसविण्याचं काम अद्याप सुरू आहे. ते पूर्ण झालेलं नाही. येत्या १५ मे पर्यंत ते पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. 

मुंबई कोस्टल रोडची एक मार्गिका खुली, कुठून कुठे आणि कसा करता येणार प्रवास?

१५ मार्च रोजी टेलिकॉम विभागाने मनपाला यासंदर्भात एक पत्र देखील लिहिलं होतं. त्यात "सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार नव्याने खुल्या झालेल्या मुंबई कोस्टल रोड टनेलमध्ये मोबाइल कनेक्टिव्हिटी सपोर्ट करत नाही आणि प्रवाशांच्या मोबाइल नेटवर्कमध्ये खंड पडत आहे. ३.५ किमी लांबीच्या दरम्यान ५-१० मिनिटांसाठी नेटवर्कमध्ये खंड पडत आहे. देखरेखीची कामं करणारे आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणारे बीएमसी कर्मचारी, विशेषत: आपत्तीसारख्या परिस्थितीत, बोगद्यातील मोबाइल सेवांमध्ये खंड पडणे योग्य नाही"

कोस्टल रोड प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. "सिविक डिपार्टमेंटच्या नियमानुसार आम्ही ओएसआर टेलिसर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला टनेलमध्ये बूस्टर अँटिना लावण्यासाठीचा पत्र व्यवहार १९ एप्रिल रोजी केला आहे. बूस्टर अँटिना बसवण्याचं काम येत्या १५ दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे", असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

Web Title: no mobile network in the coastal road tunnel what about emergency services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई