विरोधी पक्षांनी दिलेली ‘भारत बंद’ची हाक दिशाभूल करणारी : माधव भंडारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 05:45 PM2018-09-09T17:45:10+5:302018-09-09T18:05:07+5:30

नाशिक शहरात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भंडारी रविवारी (दि.९) आले होते. यावेळी त्यांनी कॉँग्रेस-राष्टवादीच्या ‘भारत बंद’ आंदोलनाबाबत आपले मत मांडले. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाल्याने सर्वसामान्य जनता त्यामध्ये होरपळून निघत आहे.

Madhav Bhandari, who is misleading the people of the 'Bharat Bandh' given by opposition parties: | विरोधी पक्षांनी दिलेली ‘भारत बंद’ची हाक दिशाभूल करणारी : माधव भंडारी

विरोधी पक्षांनी दिलेली ‘भारत बंद’ची हाक दिशाभूल करणारी : माधव भंडारी

Next
ठळक मुद्देविरोधाभास जनतेची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप

नाशिक : कॉँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा, विरोधाची भूमिका घेऊ नये तरच त्यांच्या आंदोलनाला अर्थ राहील, अन्यथा केवळ एक देखावानाट्य म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचा कॉॅँग्रेस-राष्टवादीचा हा एक प्रयत्न ठरेल, असे मत भाजपचे  प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
नाशिक शहरात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भंडारी रविवारी (दि.९) आले होते. यावेळी त्यांनी कॉँग्रेस-राष्टवादीच्या ‘भारत बंद’ आंदोलनाबाबत आपले मत मांडले. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाल्याने सर्वसामान्य जनता त्यामध्ये होरपळून निघत आहे. सरकारविरुध्द जनतेचा रोष व्यक्त होत असताना विरोधी पक्षांनी सोमवारी (दि.१०) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कालिका मंदिर परिसरात एका कार्यक्रमासाठी आलेल्या भंडारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, कॉँग्रेसचे भारतातील काही मुख्यमंत्री पेट्रोलवर जीएसटी लागू करण्यास विरोध करतात आणि दुसरीकडे त्यांचा पक्ष पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन पुकारतात हा विरोधाभास जनतेची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप भंडारी यांनी यावेळी केला. जीएसटीकक्षेत पेट्रोल-डिझेल आणण्यास त्यांनी पाठिंबा दिल्यास इंधन दरवाढीचा प्रश्न तत्काळ निकाली निघेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरवाढ कमी करण्यासाठी ही अत्यंत गरजेची बाब असून केवळ सरकारवर दरवाढीचे खापर फोडण्यापेक्षा विरोधी पक्ष म्हणून त्यांनीदेखील त्यांची जबाबदारी ओळखणे गरजेचे असल्याचे भंडारी म्हणाले.


 

Web Title: Madhav Bhandari, who is misleading the people of the 'Bharat Bandh' given by opposition parties:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.