समाजकार्यात वयाचे बंधन नसावे सचिन पिळगांवकर : वैशंपायन शाळेचा नामकरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:55 AM2018-05-06T00:55:31+5:302018-05-06T00:55:31+5:30
नाशिक : जीवनातील प्रत्येक व्यक्तिमत्त्वात एक हिरो दडलेला असतो. दडलेल्या त्या हिरोला चांगल्या समाजकार्यासाठी बाहेर काढून सत्कर्म साधा. समाजकार्यासाठी पुढे या, त्यासाठी वयाचे बंधन नसावे.
नाशिक : जीवनातील प्रत्येक व्यक्तिमत्त्वात एक हिरो दडलेला असतो. दडलेल्या त्या हिरोला चांगल्या समाजकार्यासाठी बाहेर काढून सत्कर्म साधा. समाजकार्यासाठी पुढे या, त्यासाठी वयाचे बंधन नसावे. जो समाजकार्यासाठी स्वत:हून पुढे येतो तोच खरा हिरो असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी केले. दि नाशिक एज्युकेशन इन्स्टिट्यूट संस्थेच्या कामटवाडे येथील स्व. प्रभाकर पुरु षोत्तम वैशंपायन शाळेच्या नामकरण उद्घाटन समारंभानिमित्त परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अभिनेता स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, रणांगण चित्रपटातील अभिनेत्री प्रणाली गोगरे, रजनी पाटील, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन, उपाध्यक्ष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. सचिन पुढे म्हणाले की, आम्ही चित्रपटातले हिरो असलो तरी ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी तन-मन-धनाने वाहून घेतले तेच पडद्यामागील खरे हिरो आहेत. समाजकार्यासाठी पुढे या, त्यासाठी वयाचे बंधन नसावे. तसेच त्या व्यक्तिमत्त्वात कोणावरही उपकार करत आहोत अशी भावना नसावी, असेही मत त्यांनी व्यक्त केले. पडोळ कुटुंबीयांनी एक रु पया घेऊन आपल्या मालकीची दीड एकर शेतजमीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्थेला दिली असल्याने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्ष स्व. बाबासाहेब वैशंपायन व स्व. कचेश्वर फकिरा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अनुराधा बस्ते यांनी सूत्रसंचालन केले.