विखरणीतील दोन बंधारे पहिल्याच पावसात तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:56 AM2018-06-25T00:56:54+5:302018-06-25T00:57:10+5:30

पंचायत समिती  सदस्य मोहन शेलार यांच्या प्रयत्नातून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विखरणी येथील दोन ते तीन बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला. यामुळे या बंधा-यांची  पाणी साठवण क्षमता दुपटीने वाढली आहे.

 The two bogs of the scattered tumors tumble in the first rain | विखरणीतील दोन बंधारे पहिल्याच पावसात तुडुंब

विखरणीतील दोन बंधारे पहिल्याच पावसात तुडुंब

googlenewsNext

पाटोदा : पंचायत समिती  सदस्य मोहन शेलार यांच्या प्रयत्नातून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विखरणी येथील दोन ते तीन बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला. यामुळे या बंधा-यांची  पाणी साठवण क्षमता दुपटीने वाढली आहे.  शनिवारी झालेल्या पहिल्याच पावसात हे बंधारे तुडुंब भरले असून, परिसरातील पाणीप्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. जलयुक्त  शिवार योजनेअंतर्गत काढण्यात आलेला गाळ लगतच्या शेतकºयांनी आपल्या शेतात टाकल्यामुळे  जमीन सुपीक होण्यास मदत झाली आहे.  या योजनेअंतर्गत ज्या गावांच्या बंधाºयातील गाळ काढला आहे तेथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असून, गत काही वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेला हा भाग यावर्षी बागायती पिके घेऊ शकेल व यातून बळीराजाची आर्थिक परिस्थिती सक्षम होईल, अशी भावना सुकदेव रोठे, लक्ष्मण शेलार, बाळासाहेब उशीर, रवींद्र रोठे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title:  The two bogs of the scattered tumors tumble in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.