दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही मग पाकिस्तानात करायचे का? अमित शहांचा ममता बॅनर्जींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 03:44 PM2019-01-22T15:44:58+5:302019-01-22T15:45:33+5:30
आज मालदा येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मालदा ( पश्चिम बंगाल) - आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना आव्हान देण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, आज मालदा येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बंगालमध्ये दुर्गा पूजा विसर्जन आणि सरस्वती पूजनासाठी परवानगी मिळत नाही. आता दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही तर काय पाकिस्तानमध्ये करायचे का? असा सवाल अमित शहांनी केला.
आज मालदा येथे झालेल्या सभेत अमित शहा यांनी रथयात्रा, रोहिंग्यांच्या प्रश्न, नागरिकत्व संशोधन विधेयक, दुर्गापूजा विसर्जन यासह अनेक मुद्द्यांवरून ममता बॅनर्जींना घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच शनिवारी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या महारॅलीवरही टीका केली. विरोधी पक्षांनी केलेली महाआघाडी ही सेल्फी महाआघाडी असल्याचा टोला शहा यांनी लगावला.
BJP President Amit Shah in Malda: Gathbandhan ke sare neta chahate hain ki desh mein majboor aur dheli dhala sarkar ho aur hum chahate ki desh mein majboot sarkar ho jo Pakistan ke daath khate kar de. Majboot sarkar Narendra Modi hi de sakte hain. pic.twitter.com/hJoUPbLPSJ
— ANI (@ANI) January 22, 2019