दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 03:51 PM2024-05-07T15:51:53+5:302024-05-07T15:52:17+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Election 2024 PM Modi Cast Vote Ahmedabad: Blind Girl Holds Prime Minister's Hand; see what Modi did | दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले

दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले

PM Modi Cast Vote Ahmedabad: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी गृहमंत्री अमित शाहदेखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान, मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर अशी घटना घडली, ज्यामुळे पीएम मोदींनी आपल्या सुरक्षेताली SPG कमांडोला फटकारले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

यामुळे मोदींनी फटकारले...
सविस्तर माहिती अशी की, पीएम मोदी अहमदाबादेतील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान करुन बाहेर आले आणि रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या समर्थकांना अभिवादन करण्यासाठी काही अंतर चालत गेले. यावेळी एका तरुणीने मोदींचा हात पकडला. तरुणीने हात पकडल्यानंतर एसपीजी कमांडोने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात मोदींनी त्याला फटकारले. मोदींनी आपल्याच सुरक्षा रक्षकाला फटकारण्याचे कारण म्हणजे, ती तरुण दृष्टीहीन होती आणि आपुलकीने मोदींच्या कानात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागली. पीएम मोदींनीदेखील बराचवेळ तिथे थांबून त्या तरुणीचे सगळे म्हणने ऐकून घेतले.

आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात गुजरातच्या 26 पैकी 25 जागांसाठी मतदान होत आहे. सूरतमधील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे आणि सर्व अपक्षांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे तेथील भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर पीएम मोदींनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.

Web Title: Lok Sabha Election 2024 PM Modi Cast Vote Ahmedabad: Blind Girl Holds Prime Minister's Hand; see what Modi did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.