पेट्रोल 7 तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त, सलग दुसऱ्या दिवशी किरकोळ कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 11:33 AM2018-05-31T11:33:29+5:302018-05-31T11:33:29+5:30

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये किरकोळ कपात करण्यात आली आहे.

Petrol price cut by 7 paise, diesel by 5 paise per litre | पेट्रोल 7 तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त, सलग दुसऱ्या दिवशी किरकोळ कपात

पेट्रोल 7 तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त, सलग दुसऱ्या दिवशी किरकोळ कपात

Next

नवी दिल्ली- पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. सर्वसामान्यांबरोबरच विरोधकांकडूनही सरकारवर जोरदार टीका होते आहे. पण असं असताना आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये किरकोळ कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रति लिटर 7 पैसे तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर 78.35 रूपये आणि डिझेल 69.25 रूपये असा आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर 86.16 रूपये तर डिझेल 73.73 रूपये दर आहेत. 

सलग 16 दिवस पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यानंतर बुधवारी व गुरूवारी दरांमध्ये किरकोळ घट झाली आहे. बुधवारी सकाळी पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये 59 पैशांनी घट झाल्याच्या बातम्या आल्या. पण ही सर्व माहिती चुकीची असल्याचं नंतर समोर आलं. पेट्रोल व डिझेलच्या दरात 59 पैशांनी नाही, तर फक्त 1 पैशांनी घट झाल्याचं स्पष्टीकरण इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून देण्यात आलं.  'पेट्रोल आणि डिझेलचे दर पोस्ट करताना एक तांत्रिक चूक झाली होती. ती आता दुरूस्त करण्यात आली आहे. आजच्या पेट्रोलियम पदार्थाच्या दरात काही मोठा बदल झालेला नाही. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात 59 पैशांनी घट तर दिल्लीत पेट्रोलच्या दरात 60 पैशांनी घट झाली नसून फक्त एक पैशांनी घट झाली आहे तसंच डिझेलच्या दरात दिल्लीत 56 पैशांनी व मुंबईत 59 पैशांनी घट झाली नसून ती घटही फक्त 1 पैशांनी झाली आहे', असं स्पष्टीकरण इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलं होतं. 

कर्नाटक विधानसभा निवडणूक काळात पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखण्यात आली होती. जवळपास तीन आठवडे इंधनाचे दर वाढलेले नव्हते. मात्र कर्नाटकमध्ये मतदान होताच इंधन दराचा भडका उडाला. त्यानंतर सलग 16 दिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढत राहिल्यानं त्याची मोठी झळ सर्वसामान्य जनतेला सहन करावी लागली
 

Web Title: Petrol price cut by 7 paise, diesel by 5 paise per litre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.