परभणीत पाणीपुरवठा योजनेतील अनियमिततेच्या कारवाईवरील प्रश्नांना लोणीकरांची बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 04:27 PM2018-01-25T16:27:29+5:302018-01-25T16:29:13+5:30

शहरासाठी मंजूर झालेल्या युआयडीएसएसएमटी योजनेत करण्यात आलेल्या कामांमधील अनियमिततेसंदर्भात दोषींवर कारवाई करण्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सारवासारव करणारीे उत्तरे देऊन बाजू सावरण्याचा प्रयत्न केला़ 

Lonikars next to the questions on irregularities in the water supply scheme in Parbhani | परभणीत पाणीपुरवठा योजनेतील अनियमिततेच्या कारवाईवरील प्रश्नांना लोणीकरांची बगल

परभणीत पाणीपुरवठा योजनेतील अनियमिततेच्या कारवाईवरील प्रश्नांना लोणीकरांची बगल

googlenewsNext

परभणी : शहरासाठी मंजूर झालेल्या युआयडीएसएसएमटी योजनेत करण्यात आलेल्या कामांमधील अनियमिततेसंदर्भात दोषींवर कारवाई करण्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सारवासारव करणारीे उत्तरे देऊन बाजू सावरण्याचा प्रयत्न केला़ 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकास कामांचे उद्घाटन करण्याच्या अनुषंगाने संभाव्य दौरा असल्याने या दौर्‍याच्या पूर्व तयारीसाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा परभणीचे संपर्क मंत्री बबनराव लोणीकर बुधवारी शहरात आले होते़ त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली़ त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या निधीचा पाडाच त्यांनी वाचवून दाखविला़ त्यामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी १८६७ कोटी, परभणीतील विकास कामांसाठी २९६ कोटी ३२ लाख, पाणीपुरवठा योजनेंतर्गत १११ कोटी ५४ लाख, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ६१ कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यांसाठी १५३ कोटी १२ लाख व ७४८ कोटी तसेच ३३ केव्हीचे २८ उपकेंद्र उभारण्यासाठी ६३ कोटी रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले़.

राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक तालुकास्तरावर नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समाधान शिबीर घेण्यात येणार आहे़ या अनुषंगाने प्रश्न सोडविण्याची तयारी झाल्यानंतर याबाबतचा अहवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे़ त्यानंतर ते जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या परभणी-जिंतूर, परभणी बायपास, परभणी-गंगाखेड, परभणी-किनगाव, देवगावफाटा-पाथरी, इंजेगाव-पाथरी या रस्ता कामांच्या तसेच परभणीतील अमृत योजनेच्या उद्घाटनासाठी जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याचे लोणीकर म्हणाले़ यावेळी पत्रकारांनी लोणीकर यांना परभणी शहरासाठी पूर्वी मंजूर झालेल्या युआयडीएसएसएमटी योजने संदर्भात प्रश्न विचारले़ या योजनेत झालेल्या अनियमिततेबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सचिव संतोषकुमार समितीच्या अहवालावर काय कारवाई केली? मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी योजनेची देयके देऊ नका, असे सांगितल्यानंतरही जवळपास ३ कोटी रुपये कसे काय देण्यात आले? या योजनेचे काम एका कंत्राटदाराला सुटले़, प्रत्यक्षात कामे इतर कंत्राटदारांनी केली, अमृत योजनेतही तोच प्रकार होत आहे़ या संदर्भात शासनाची काय भूमिका आहे ? असे अनेक प्रश्न लोणीकरांना विचारल्यानंतर त्यांनी सारवासारव करणारी उत्तरे दिली़ संतोषकुमार समितीच्या अहवालानंतर तांत्रिक चौकशीही करण्यात आली़ तो अहवाल गुप्त असून, कारवाईसाठी नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे़ त्यावर आताच काही सांगता येणार नाही, असे लोणीकर म्हणाले़

परभणीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रिड योजनेंतर्गत प्रयत्न केले जात असून, सर्व धरणे एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी उत्तर दिले़ विचारलेल्या मूळ प्रश्नाकडे बगल देत दुसरेच उत्तरे लोणीकर हे देत असल्याने त्यांना पुन्हा पत्रकारांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या अनियमिततेबाबत प्रश्न विचारले़ त्यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा विषय नगरविकास खात्याकडे येतो़ हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे़ त्यामुळे याबाबत अधिक माहिती आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगून पुन्हा सारवासारव  केली़ यावेळी आ़ मोहन फड,  जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, माजी आ़ विजय गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष अभय चाटे आदींची उपस्थिती होती़ 

आहे त्या पदावर समाधानी
यावेळी पत्रकारांनी त्यांना लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपाकडून जिल्ह्याला निधी दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे़ तुम्ही लोकसभेची तयारी करीत आहात का? असा प्रश्न केला असता, आपण आहे त्या पदावर समाधानी आहोत़ त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविण्याचा अद्याप विचार नसल्याचे ते म्हणाले़ 

Web Title: Lonikars next to the questions on irregularities in the water supply scheme in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.