The Alliance accepted the 'political party' and rejected the 'political party'
युती अन् आघाडीच्या राजकीय कुटुंबातील ‘यांना’ स्वीकारलं, तर ‘यांना’ नाकारलं By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 04:23 PM2019-10-25T16:23:52+5:302019-10-25T16:33:32+5:30Join usJoin usNext आदिती तटकरे, राष्ट्रवादी- विजयी; राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या. येथील राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अवधूत तटकरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आदिती यांनी प्रथमच निवडणूक लढवित श्रीवर्धन मतदारसंघातून विजय मिळविला. देवयानी फरांदे, भाजपा- विजयी; विधान परिषदेचे माजी सभापती ना. सं. फरांदे यांच्या स्नुषा. नाशिक मध्य मतदारसंघामधून सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. वर्षा गायकवाड, काँग्रेस- विजयी; काँग्रेसचे खासदार एकनाथराव गायकवाड यांची कन्या. मुंबईमधील धारावी मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. प्रणिती शिंदे, काँग्रेस- विजयी; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या. सोलापूर मध्यमधून दुस-यांदा विजयी. येथे सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पंकजा मुंडे, भाजप- पराभूत; भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या. घरच्याच म्हणजे परळी मतदारसंघामध्ये त्यांना चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी पराभूत केले. प्रचारादरम्यान या भावा-बहिणीमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या. निर्मला गावित, शिवसेना- पराभूत; माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या. काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवबंधन बांधले होते. इगतपुरी मतदारसंघातून ‘त्या’ पराभूत झाल्या. रोहिणी खडसे; भाजप- पराभूत; माजी मंत्री भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या जळगावमधल्या मुक्ताईनगरमधून पराभूत झाल्या. खडसे यांची उमेदवारी कापल्यानंतर भाजपने त्यांच्या कन्येला निवडणुकीमध्ये उतरविले होते. स्नेहलता कोल्हे, भाजप- पराभूत; माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा. नगर जिल्ह्यातील कोपरगाव काळे-कोल्हे या दोन गटांमधील शह-काटशह पुढच्या पिढीतही सुरूच असलेले दिसते.टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019पंकजा मुंडेवर्षा गायकवाडMaharashtra Assembly Election 2019Pankaja MundeVarsha Gaikwad