मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी तीनपर्यंत ३६.५४ % मतदान; कर्जत, उरणमध्ये सर्वाधिक मतदान
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: May 13, 2024 03:56 PM2024-05-13T15:56:02+5:302024-05-13T15:56:26+5:30
अकरानंतर पनवेल, कर्जत मतदारसंघात जास्त मतदान होत असल्याचे चित्र आहे...
पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दुसऱ्या टप्प्यात ३६.५४ टक्के मतदान झाले आहे. दुपारी तीनपर्यंत मतदारसंघातील सहा विधानसभामध्ये सर्वाधिक मतदान कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघात झाले आहे. मावळ, चिंचवड, आणि पिंपरीमध्ये कमी मतदान झाले आहे.
सकाळी काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर उखडा गर्मीमुळे सोसायटीतील मतदारानी सकाळीच मतदान केले. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान केंद्रावर रांगा होत्या. काही ठिकाणी निवडणूक आयोगाच्या वतीने मंडप उभारण्यात आले होते. तर काही ठिकाणी नागरिक उन्हातच उभे होते.
अकरा ते एकच्या दरम्यान मतदान वाढले...
सकाळी अकरापर्यंत संथगतीने मतदान झाले. मात्र, त्यानंतर मतदानाचा टक्का वाढत असल्याचे दिसून आले. अकरानंतर पनवेल, कर्जत मतदारसंघात जास्त मतदान होत असल्याचे चित्र आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत झालेले मतदान-
विधानसभा झालेले मतदान (टक्केवारी)
पनवेल : ३४.९३
कर्जत : ३८.०३
उरण : ४२.८९
मावळ : ३७.५
चिंचवड : ३५.१८
पिंपरी : ३३.७४