बळीराजासाठी ‘गुड न्यूज’! यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस, हवामान केंद्राचा अंदाज

By श्रीकिशन काळे | Published: March 28, 2024 03:56 PM2024-03-28T15:56:36+5:302024-03-28T15:57:30+5:30

या वर्षी मॉन्सूनमध्ये प्रशांत महासागरामधील ‘एल-निनो’ची स्थिती निवळणार आहे...

'Good news' for farmer More than average rainfall this year, forecast by the Meteorological Center | बळीराजासाठी ‘गुड न्यूज’! यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस, हवामान केंद्राचा अंदाज

बळीराजासाठी ‘गुड न्यूज’! यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस, हवामान केंद्राचा अंदाज

पुणे : यंदाचा पावसाळा भारतासाठी अतिशय आनंददायी असणार आहे. कारण जुलै ते सप्टेंबर या दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आशिया -पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या (अपेक) हवामान केंद्राने दिला आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही ‘गुड न्यूज’ आहे.

या वर्षी मॉन्सूनमध्ये प्रशांत महासागरामधील ‘एल-निनो’ची स्थिती निवळणार आहे. तर ‘ला-निना’ची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी यंदाचा पाऊस चांगला पडणार अराहे. ‘अपेक’ या हवामान केंद्राच्या वतीने पहिला अंदाज व्यक्त केला आहे. भारतासोबतच इंडोनेशिया, पूर्व आफ्रिका, अरबी समुद्र, कॅरिबियन समुद्र, उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, दक्षिण ऑस्ट्रेलिया, दक्षिण पॅसिफिक या प्रदेशांमध्येही अधिक पाऊस असणार आहे.

एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी ‘ला-निना’ स्थिती तयार होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. परिणामी हवामानविषयी काम करणाऱ्या संशोधकांना त्याचे निरीक्षण करणे शक्य होईल. मार्च ते मे २०२४ दरम्यान भारतात अल निनोचा प्रभाव असेल, तर जून ते सप्टेंबर या दरम्यान ‘ला निना’च्या स्थितीमुळे पावसाच्या प्रमाणावर चांगला परिणमा होणार असल्याचे अपेक संस्थेने नमूद केले आहे.

Web Title: 'Good news' for farmer More than average rainfall this year, forecast by the Meteorological Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.