रत्नागिरी यापुढे मॅँगो पर्यटन सिटी,-नगराध्यक्ष राहुल पंडित यांची माहिती, पर्यटन विकासासाठी सर्व व्यक्ती, संस्था एकत्र, अनेक सुविधा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:59 PM2018-01-23T15:59:41+5:302018-01-23T16:04:17+5:30
रत्नागिरी मॅँगो पर्यटन सिटी अशी रत्नागिरी शहराची नवीन ओळख यापुढे निर्माण केली जाणार आहे. रत्नागिरी शहर व गणपतीपुळे परिसरात वर्षभरातील मोठ्या विक एन्डला येणाऱ्या पर्यटकांना विविध पर्यटन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रत्नागिरी मॅँगो पर्यटन भरारी या नावाने पर्यटन क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्व व्यक्ती व संस्था त्यासाठी एकत्र काम करणार आहेत. ही माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : रत्नागिरी मॅँगो पर्यटन सिटी अशी रत्नागिरी शहराची नवीन ओळख यापुढे निर्माण केली जाणार आहे. रत्नागिरी शहर व गणपतीपुळे परिसरात वर्षभरातील मोठ्या विक एन्डला येणाऱ्या पर्यटकांना विविध पर्यटन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
रत्नागिरी मॅँगो पर्यटन भरारी या नावाने पर्यटन क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्व व्यक्ती व संस्था त्यासाठी एकत्र काम करणार आहेत. ही माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी शहराच्या भाट्ये समुद्र किनारी व्हॅली क्रॉसिंग, तर रत्नदुर्ग किल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेमधील सफरीचा थरार आणि रॅपलिंग या साऱ्याच्या अनुभव पर्यटकांना व रत्नागिरीकरांना देण्याची जबाबदारी रत्नागिरीच्या जिद्दी माऊंटेनिअरिंग आणि रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सने स्वीकारली आहे.
थिबा पॅलेससमोरील सागरी बेटाच्या सफरीसह हातिसपर्यंत बॅक वॉटरची सफर डॉल्फिन बोट क्लब, सुशेगाद जलविहार संस्थांतर्फे घडवली जाणार आहे. मालगुंड किनाऱ्यावर पर्यटकांना पॅरामोटरिंग सुविधा मिळणार आहे. पर्यटकांसाठी हॉटेल्सच्या माध्यमातून पर्यटन पॅकेजिस दिली जाणार आहेत.
यावेळी सुहास ठाकुरदेसाई, सचिन देसाई, धीरज पाटकर, राज घाडीगावकर, प्रशांत परब, जितेंद्र शिंदे, भाई रिसबूड, वीरेंद्र वणजु, गणेश चौगुले, एरिक, वैभव सरदेसाई आदी उपस्थित होते. यावेळी मीडिया माहिती पत्रकाचे प्रकाशनही झाले.