श्वास चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत वेंगुर्ले शहराचे स्वच्छता अ‍ॅम्बॅसिडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:16 AM2017-11-30T11:16:40+5:302017-11-30T11:30:13+5:30

वेंगुर्ले नगरपरिषदेने आयोजित केलेल्या स्वच्छता साक्षरता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने वेंगुर्ले शहराचे स्वच्छतेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर, श्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या हस्ते सोमवारी वेंगुर्ले बाजारपेठ परिसरात कचरा डस्टबीनचे वाटप करण्यात आले. याशिवाय त्यांनी वेंगुर्ले बसस्थानक व वर्दळीच्या ठिकाणी भेटी देऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

Shabas film director Sandip Sawant Vengurley's cleanliness ambassador of the city | श्वास चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत वेंगुर्ले शहराचे स्वच्छता अ‍ॅम्बॅसिडर

वेंगुर्ले बाजारपेठ येथे दुकानदारांना संदीप सावंत यांच्या हस्ते कचरा डस्टबीनचे वाटप करण्यात आले. यावेळी दिलीप गिरप, अस्मिता राऊळ आदी उपस्थित होते. (प्रथमेश गुरव)

Next
ठळक मुद्देवेंगुर्ले शहरात कचरा डस्टबीनचे वाटप बसस्थानक व वर्दळीच्या ठिकाणी भेटी

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेने आयोजित केलेल्या स्वच्छता साक्षरता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने वेंगुर्ले शहराचे स्वच्छतेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर, श्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या हस्ते सोमवारी वेंगुर्ले बाजारपेठ परिसरात कचरा डस्टबीनचे वाटप करण्यात आले. याशिवाय त्यांनी वेंगुर्ले बसस्थानक व वर्दळीच्या ठिकाणी भेटी देऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

वेंगुर्ले शहराने स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छतेत देशात प्रथम येण्यासाठी सज्ज झाली आहे. जानेवारी ते मार्च २०१८ या वर्षात केंद्र सरकारकडून देशात स्वच्छतेच्या बाबतीत परिपूर्ण असणारी दहा शहरे निवडली जाणार असून, या स्पर्धेसाठी वेंगुर्ले शहराचे नामांकन झाले आहे. केंद्र्र शासनाने निवडलेल्या दहा शहरांमध्ये वेंगुर्ले शहराचा समावेश असून, त्याकरिता निकष पूर्ण करण्यासाठी चार हजार गुण मूल्यांकनासाठी ठेवण्यात आलेले आहेत.

स्वच्छतेत देशात प्रथम येण्यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेने प्रसिद्ध निर्माते व  श्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांची वेंगुर्ले शहर स्वच्छतेच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडरपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या उपस्थितीत पालिकेने स्वच्छताविषयक उपक्रम राबवून सुरुवात केली.

यावेळी दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या हस्ते बाजारपेठेतील दुकानदारांना कचरा डस्टबीनचे वाटप करण्यात आले. त्यानंतर वेंगुर्ले बसस्थानक तसेच आजूबाजूच्या वर्दळीच्या ठिकाणी भेटी देऊन परिसर स्वच्छ ठेवणे, स्वच्छता राखणे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही आरोग्य किटचे वाटप करण्यात आले.


यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी रामदास कोकरे, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक तुषार सापळे, सुमन निकम, प्रशांत आपटे, शीतल आंगचेकर, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, साक्षी पेडणेकर, स्नेहल खोबरेकर, पूनम जाधव आदी नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष गिरप यांनी शहरातील प्रत्येक वॉर्डची जबाबदारी नगरसेवकांनी वाटून घ्यावी व स्वछतेचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे, असे आवाहन केले.
 

Web Title: Shabas film director Sandip Sawant Vengurley's cleanliness ambassador of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.