सोलापूर शहरात हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:53 PM2018-04-10T14:53:00+5:302018-04-10T14:53:00+5:30

वादळामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने पाण्याचा उपसा मंदावल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. 

Water supply in the border area of ​​Solapur city was disrupted | सोलापूर शहरात हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

सोलापूर शहरात हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

googlenewsNext
ठळक मुद्देचार दिवसानंतरही वेळेवर व पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांची ओरड सुरू पाणीपुरवठा विभागातील अडचणी ओळखून झोन अधिकारी बदलण्याच्या हालचाली सुरू

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात निर्माण झालेल्या वादळामुळे शहर पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वादळामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने पाण्याचा उपसा मंदावल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. 

शनिवार व रविवारी माढा तालुक्यात वादळी वाºयाने वीजपुरवठ्यात व्यत्यय आला. यामुळे उजनी जलवाहिनीवरील पाणी उपसा मंदावला. हीच परिस्थिती टाकळी योजनेवर निर्माण झाली आहे. शनिवारी टाकळी पंपहाऊसजवळ जलवाहिनी फुटली. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. साडेतीन तास दुरुस्तीला लागले. त्यानंतर पंप सुरू करण्यात आले. उजनी व टाकळी जलवाहिनीवर गेल्या दोन दिवसात वारंवार ताण आल्याने शहराला होणाºया पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका हद्दवाढ भागात मोठ्या प्रमाणावर बसला असल्याची तक्रार नगरसेवक अविनाश पाटील, विनायक विटकर यांनी केली आहे. टाक्या पूर्णपणे भरल्यानंतर पुरेसा दाब मिळेल अशा रितीने पाणीपुरवठ्याचे नियोजन व्हावे. पाणी उशिराने आले तरी चालेल पण पुरेसा दाब असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

उन्हाच्या कडाक्यामुळे वितरणाला पाणी जादा लागत आहे. अशात उजनीतून सोडलेले पाणी औज बंधाºयात येण्यास विलंब झाल्याने पाणी वितरणाचे वेळापत्रक कोलमडले. आणखी आठवडाभर चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला. उजनी व चिंचपूर बंधारे भरल्यानंतर वेळापत्रक पूर्ववत करण्याची तयारी सुरू असतानाच वादळाचा फटका बसला आहे. उपलब्ध पाण्यातून शहर आणि हद्दवाढ भागाचे नियोजन करताना अडचणी वाढल्या आहेत. 

इकडे चार दिवसानंतरही वेळेवर व पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांची ओरड सुरू आहे. 

अधिकाºयांच्या बदल्या
- पाणीपुरवठा विभागातील अडचणी ओळखून झोन अधिकारी बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. यापूर्वी पाणीपुरवठा विभागात काम केलेल्या अधिकाºयांना पुन्हा या विभागात घेतले जाणार आहे. पाणीपुरवठा विभागात वितरणाची माहिती नसलेले अधिकारी कार्यरत असल्याने समस्या निर्माण झाल्याने तातडीने हा बदल करण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याचा अनुभव असलेल्या अधिकाºयांचा सोमवारी शोध सुरू होता. 

Web Title: Water supply in the border area of ​​Solapur city was disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.