OMG : अमिताभ बच्चन यांच्या घरात मराठीसह बोलल्या जातात 'या' भाषा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 04:40 PM2018-08-28T16:40:55+5:302018-08-29T08:30:00+5:30

अमिताभ बच्चन यांना सदी के महानायक असे म्हटले जाते. त्यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तीक आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्यांची इच्छा असते

OMG: Amitabh Bachchan's house is spoken in Marathi with 'this' language | OMG : अमिताभ बच्चन यांच्या घरात मराठीसह बोलल्या जातात 'या' भाषा

OMG : अमिताभ बच्चन यांच्या घरात मराठीसह बोलल्या जातात 'या' भाषा

ठळक मुद्दे''माझ्या कुटुंबात देशातील विविध प्रातांतील लोक आहेत'' ''मी उत्तरेकडचा आहे तर माझ्या पत्नी या बंगाली आहेत. माझी सून ही दक्षिणेकडची आहे''

अमिताभ बच्चन यांना सदी के महानायक असे म्हटले जाते. त्यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तीक आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्यांची इच्छा असते. अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या राय बच्चन हे सगळेच बॉलीवूडचा एक भाग आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात कोणत्या भाषेत संवाद साधला जातो. घरात चित्रपटाविषयी गप्पा रंगतात का असे अमिताभ बच्चन यांना कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेच्या वेळी विचारले असता ते सांगतात, माझ्या कुटुंबात देशातील विविध प्रातांतील लोक आहेत. मी उत्तरेकडचा आहे तर माझ्या पत्नी या बंगाली आहेत. माझी सून ही दक्षिणेकडची आहे. त्यामुळे आमच्या घरात देशातील विविध प्रांतातील सगळ्याच भाषा बोलल्या जातात. माझ्या घरात याशिवाय पंजाबी, मराठी भाषेत देखील काही वेळा संवाद साधला जातो.

अमिताभ यांच्या सिनेमामांबाबत बोलायचे झाले तर ते  'ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आमिर व अमिताभ ही जोडी या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र दिसणार आहे. आमिरच्या अपोझिट सना शेख आणि कॅटरिना कैफ या दोघी आहेत. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे आमिर खान आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्याने या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना चांगलीच लागली आहे. 

Web Title: OMG: Amitabh Bachchan's house is spoken in Marathi with 'this' language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.