ठाण्याला पुढील आठ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा, ठाणेकरांना जपून पाणी वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 05:25 PM2017-11-24T17:25:02+5:302017-11-24T17:27:52+5:30
ठाण्याला पुढील आठ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पाणी पुरवठा विभागाने, या काळात जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
ठाणे - ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणेकरीता पिसे येथे भातसा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, तसेच वार्षिक देखभाल व दुरु स्तीचे काम चालू असल्याने बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी करण्यात आलेली आहे. त्यामुळे, पुढील आठ दिवस ठाणे शहरास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.
पिसे येथे भातसा नदीवर बंधारा बांधण्यात आलेला असून या बंधाऱ्यातून अशुध्द पाण्याचा पुरवठा ठाणे महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रात करण्यात येतो. सद्यस्थितीत वार्षिक देखभाल व दुरूस्तीचे काम सुरू असल्याने पुढील आठ दिवस ठाणे शहराला पिसे येथून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.