वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेशाच्या ११७३ जागेसाठी १०३८ प्रवेश अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:29 PM2018-03-07T13:29:44+5:302018-03-07T13:29:44+5:30

वाशिम : दिव्यांगांसह मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेशाच्या एकूण ११७३ जागेसाठी ६ मार्चपर्यंत १०३८ आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर झाले आहेत.

1038 admission forms for 1173 seats for free seats Washim district! | वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेशाच्या ११७३ जागेसाठी १०३८ प्रवेश अर्ज !

वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेशाच्या ११७३ जागेसाठी १०३८ प्रवेश अर्ज !

Next
ठळक मुद्देआरटीईअंतर्गत वाशिम जिल्ह्यात १०२ खासगी शाळांची नोंदणी झालेली आहे.शिक्षण विभागाने ७ मार्चपर्यंत प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. ६ मार्चपर्यंत एकूण १०३८ प्रवेश अर्ज आॅनलाईन पद्धतीने सादर झाले.

वाशिम : दिव्यांगांसह मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेशाच्या एकूण ११७३ जागेसाठी ६ मार्चपर्यंत १०३८ आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर झाले आहेत.

शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीईअंतर्गत वाशिम जिल्ह्यात १०२ खासगी शाळांची नोंदणी झालेली आहे. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के मोफत कोट्यातून प्रवेश देण्यासाठी सुरूवातीला २८ फेब्रुवारी अशी प्रवेश अर्जाला मुदत देण्यात आली होती. अंतिम मुदतीपर्यंत अनेक पालकांना आपल्या पाल्याच्या मोफत प्रवेशासाठी अर्ज दाखल करता आले नाहीत. या पृष्ठभूमीवर प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होताच, शिक्षण विभागाने ७ मार्चपर्यंत प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. ६ मार्चपर्यंत एकूण १०३८ प्रवेश अर्ज आॅनलाईन पद्धतीने सादर झाले.

दरम्यान, ग्रामीण भागातील शाळांपेक्षा शहरी भागातील शाळांकडे पालकांचा कल अधिक असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात प्रवेश अर्ज दाखल झाले नसल्याने काही जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: 1038 admission forms for 1173 seats for free seats Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.