शेततळे अस्तारीकारांसाठी मिळणार ७५ हजार रूपयांचे अनुदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 07:57 PM2017-10-17T19:57:49+5:302017-10-17T19:59:42+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या किंवा इतर योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांसाठी प्लास्टिक फिल्म अस्तारीकारांसाठी कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात अनुदान देण्यात येणार आहे.

Grant for 75,000 rupees to farmers for the farmers! | शेततळे अस्तारीकारांसाठी मिळणार ७५ हजार रूपयांचे अनुदान !

शेततळे अस्तारीकारांसाठी मिळणार ७५ हजार रूपयांचे अनुदान !

googlenewsNext
ठळक मुद्दे२३ ऑक्टोबर अंतिम मुदत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या किंवा इतर योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांसाठी प्लास्टिक फिल्म अस्तारीकारांसाठी कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात अनुदान देण्यात येणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेततळे या घटकाखाली फिल्म अस्तरीकरणासाठी शेततळ्याच्या प्रत्यक्ष मोजमापानुसार लागणाऱ्या फिल्मच्या खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार रुपये अनुदान स्वरुपात दिले जाणार आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज २३ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने स्वतंत्रपणे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केले आहे.
शेततळ्यासाठी वापरायची फिल्म उच्च दर्जाची असणे आवश्यक आहे. शेततळे अस्तरीकरणासाठी वाशिम जिल्ह्याकरिता १२० भौतिक व ९० लाख रुपये आर्थिक लक्षांक आहे. त्यानुसार सर्व तालुक्यांना २० भौतिक व १५ लाख रुपये आर्थिक लक्षांक देण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करावेत. तालुक्यांना देण्यात आलेल्या लक्षांकापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यास  २५ ऑक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन गावसाने यांनी केले.
 

Web Title: Grant for 75,000 rupees to farmers for the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी