वाशिममधील १३ शाळांमध्ये उद्यापासून चालते-फिरते विज्ञान प्रदर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 09:12 PM2017-11-15T21:12:05+5:302017-11-15T21:17:16+5:30
कारंजा लाड (वाशिम): भारत सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालयाच्या वतीने रामन विज्ञान केंद्राच्या प्रचार व प्रसारासाठी विविध विज्ञान उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील १३ शाळांमध्ये १६ नोव्हेंबरपासून चलायमान विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम): भारत सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालयाच्या वतीने रामन विज्ञान केंद्राच्या प्रचार व प्रसारासाठी विविध विज्ञान उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील १३ शाळांमध्ये १६ नोव्हेंबरपासून चलायमान विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी तसेच परिसरातील शाळांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विज्ञान अध्यापक मंडळाचे विभागीय उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष विजय भड यांनी केले आहे.
रामन विज्ञान कद्रामार्फत एक बस तयार करण्यात आली असून त्यात विविध वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले आहे. अशी ही चलायमान विज्ञान प्रदर्शनीचे वाहन वाशिम जिल्ह्यात धडकले असून १६ नोव्हेंबर रोजी जे.सी. हायस्कुल, कारंजा, १७ व १८ नोव्हेंबरला एम.बी.आश्रम हायस्कुल, कारंजा, २० व २१ नोव्हेंबरला मोहनलाल भंन्साळी हायस्कुल, धनज बु, २२ व २३ नोव्हेंबरला बाबासाहेब धाबेकर विद्यालय, यावर्डी, २४ व २५ नोव्हेंबरला वसंत विद्यालय, पोहा, २७ व २८ नोव्हेंबरला यशवंत विद्यालय, वाई, २९ व ३० नोव्हेंबरला नृसींह विद्यालय, धामणी खडी, १ व २ डिसेंबरला शिवाजी हायस्कुल, किन्हीराजा, ४ व ५ डिसेंबरला जय बजरंग विद्यालय, सुकांडा, ६ व ७ डिसेंबरला शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, मुसळवाडी, ८ व ९ डिसेंंबरला शांतीकिसन विद्यालय, कळंबेश्वर, ११ व १२ डिसेंबरला जिजामाता विद्यालय, पांगरी नवघरे, १३ व १४ डिसेंबरला राष्ट्रीय विद्यालय, वसारी येथे उपलब्ध राहणार आहे. नमूद शाळांशी परिसरातील शाळांनी संपर्क करून आपल्याही शाळेतील विद्यार्थ्यांना ही प्रदर्शनी दाखवावी, असे आवाहन भड यांनी केले आहे.