वाशिम : रिसोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; प्रकल्पाने गाठला तळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 08:07 PM2018-01-31T20:07:16+5:302018-01-31T20:11:37+5:30

रिसोड - रिसोड तालुक्यातील १७ प्रकल्पांनी तळ गाठला असून, जवळपास ६५ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना नसल्याने, गावक-यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Washim: severe water shortage in Risod taluka; Project reached the bottom! | वाशिम : रिसोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; प्रकल्पाने गाठला तळ!

वाशिम : रिसोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; प्रकल्पाने गाठला तळ!

Next
ठळक मुद्देनागरिकांची पाण्यासाठी भटकंती उपायययोजना शून्य

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड - रिसोड तालुक्यातील १७ प्रकल्पांनी तळ गाठला असून, जवळपास ६५ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना नसल्याने, गावक-यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सन २०१७ मध्ये पावसाने सरासरी गाठली नव्हती. त्यामुळे प्रकल्पांत पुरेशा प्रमाणात जलसाठा होऊ शकला नाही. विहिरी व बोअरवेलची जलपातळीदेखील समाधानकारक नव्हती. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईची चाहूल लागली होती. डिसेंबर महिन्यात प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडा जाहिर केला. त्याअनुषंगाने पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये विविध उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. रिसोड तालुक्यात अद्याप काही गावातील विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. दुसरीकडे तालुक्यातील १७ प्रकल्पांनीदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे शेतातील विहिरींवरून पाणी आणण्याची कसरत नागरिकांना करावी लागत आहे. मजूरवर्गाला सकाळच्या वेळी कामधंदे सोडून पाणी आणण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे. प्रशासनाने आतापासूनच ठोस उपाययोजना करणे अपेक्षीत असताना, याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष नागरिकांची चिंता वाढविण्यास पुरेसे ठरत आहे. नळ पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती, तात्पुरती नळ योजना, विहिर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा, पाणीपुरवठा योजनांचे पुनरूज्जीवन आदी उपाययोजनांची अंमलबजावणी होणे गाावकºयांना अपेक्षीत आहे. 

Web Title: Washim: severe water shortage in Risod taluka; Project reached the bottom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.