उत्तर मुंबईत १७ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते; ५ जणांना ५०० मतेही नाहीत

By रेश्मा शिवडेकर | Published: June 6, 2024 09:20 PM2024-06-06T21:20:29+5:302024-06-06T21:20:59+5:30

उत्तर मुंबईत एकूण १०,३५,७३१ जणांनी मतदान केले. येथून ६ लाख ८० हजार १४६ मते मिळवून भाजपचे पीयूष गोयल विजयी झाले.

17 candidates got less than Nota votes in North Mumbai; 5 people don't even have 500 votes | उत्तर मुंबईत १७ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते; ५ जणांना ५०० मतेही नाहीत

उत्तर मुंबईत १७ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते; ५ जणांना ५०० मतेही नाहीत

मुंबई - उत्तर मुंबईतून निवडणुक लढवणारे १९ पैकी दोन उमेदवार वगळता अन्य १७ उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतदान झाले आहे. या ठिकाणी १३,२४८ इतक्या मतदारांनी नोटासमोरील बटन दाबून आपला मतदानाचा अधिकार बजावला. २०१९च्या तुलनेत यात १,३८० मतांनी वाढ झाली आहे.

२०० ते सहा हजार मते

उत्तर मुंबईत एकूण १०,३५,७३१ जणांनी मतदान केले. येथून ६ लाख ८० हजार १४६ मते मिळवून भाजपचे पीयूष गोयल विजयी झाले. तर काँग्रेसच्या भूषण पाटील यांना ३ लाख २२ हजार ५३८ मते मिळाली आहेत. त्या खालोखाल वंचितच्या अॅड. सोनल गोंडाणे यांना ६,०५२ मते मिळाली आहेत. त्या खालोखाल बसपचे रईस डॉक्टर यांना २,९२३ इतकी मते मिळाली आहेत. या दोघांसह अन्य १७ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. इतरांना २०० ते दीड हजाराच्या दरम्यान मते मिळाली आहेत.

उत्तर मुंबईतून नोटाला आतापर्यंत झालेले मतदान

२०१४ - ८,७५८

२०१९ - ११,९६६

२०२४ - १३,३४६

सर्वात कमी मते मिळालेले पाच उमेदवार

संजय मोराखिया - २१०

सय्यद आलम - ३४८

अलेख मेश्राम - ३९६

जनेंद्र सुर्वे - ४०५

रवी गवळी -  ४५०

विधानसभानिहाय नोटा

बोरीवली……३,१११

दहिसर………२,०४७

मागाठाणे……२,६६३

कांदिवली(पू)…१,७८६

चारकोप……..२,१०३

मालाड (प)….१,५३८

Web Title: 17 candidates got less than Nota votes in North Mumbai; 5 people don't even have 500 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.