महाविकास आघाडीची 3 तास बैठक, अजित पवारांचा चकवा तर उद्धव ठाकरे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 09:24 PM2019-11-27T21:24:33+5:302019-11-27T21:29:31+5:30
महाविकास आघाडीच्या बैठकीत शपथविधी आणि खातेवाटपाबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुंबई- महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची यशवंत चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अहमद पटेल, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे यांच्यासह अजित पवार आणि काही महत्त्वाचे नेते हजर होते. या बैठकीनंतर बाहेर पडल्यावर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी चुप्पी साधली. तेरी भी चूप, मेरी भी चूप अशीचा परिस्थिती बैठकीनंतर पाहायला मिळाली. तर, अजित पवार यांनी मीडियाला चकवा देत आपली गाडी गाठली.
महाविकास आघाडीच्या बैठकीत शपथविधी आणि खातेवाटपाबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यातच, विधानसभा अध्यक्षपदावरुन खलबतं झाली आहेत. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी चिंता करण्याची कारण नाही, असे म्हटलंय. तर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हेरी गुड एवढंच म्हटलंय. बाळासाहेब थोरात यांनीही सकारात्मक चर्चा झाली असून उर्वरित चर्चा रात्री होणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे, जागावाटपाचा आणि सत्तावाटपाच तिढा कायम असल्याचं दिसून येतंय. मात्र, उद्या उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही आमदार शपथ घेणार असल्याचं समजतंय.
Congress' Ahmed Patel after attending the meeting of NCP-Congress-Shiv Sena MLAs in Mumbai: We have sorted out all the issues, you will get to know tomorrow. #Maharashtrapic.twitter.com/6TdwB3qYnA
— ANI (@ANI) November 27, 2019
महाविकास आघाडीच्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक चालली, पण अद्यापही इतर मंत्र्यांची नावं किंवा माहिती जाहीर करण्यात आली नाही.
Mumbai: Ajit Pawar leaves after attending the meeting of NCP-Shiv Sena-Congress MLAs at YB Chavan Centre. #Maharashtrapic.twitter.com/5PZGj9aeR3
— ANI (@ANI) November 27, 2019
Mumbai: Shiv Sena's Uddhav Thackeray, Congress's Ahmed Patel & other 'Maha Vikas Aghadi' leaders leave after attending the meeting of Congress-Shiv Sena-NCP MLAs at Y.B. Chavan Center. #Maharashtrapic.twitter.com/cVPpO9IdL3
— ANI (@ANI) November 27, 2019