विसर्जन सोहळ्यासाठी येणार तीनशे परदेशी पर्यटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 06:04 AM2018-09-22T06:04:48+5:302018-09-22T06:05:17+5:30

मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्याला ग्लोबल महत्त्व मिळवून देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.

300 foreign tourists to come for immersion ceremony! | विसर्जन सोहळ्यासाठी येणार तीनशे परदेशी पर्यटक!

विसर्जन सोहळ्यासाठी येणार तीनशे परदेशी पर्यटक!

Next

मुंबई : मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्याला ग्लोबल महत्त्व मिळवून देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवर आॅनलाइन बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा लाभ घेऊन तब्बल तीनशे परदेशी पर्यटकांना गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहता येईल. मोठ्या प्रमाणात भाविक येथे येणार असल्याने, त्यांची गैरसोय टाळण्यासाठी चौपाटीवरील मुख्य प्रवेशद्वाराची रुंदीही वाढविण्यात आली आहे.
मुंबईतील मोठ्या उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होते. बाप्पाच्या दर्शनासाठी गिरगाव चौपाटीवर परदेशी पाहुणे, शहरबाहेरचे पर्यटकही गर्दी करतात. या गर्दीवर नियंत्रण ठेवून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने या जागेचा आपत्कालीन परिस्थिती नियंत्रण आराखडा तयार केला आहे. गिरगाव चौपाटीवरील मुख्य प्रवेशद्वाराची रुंदी वाढविण्यासाठी महापालिका आणि पोलिसांचे मंडप मागे घेण्यात आले.
अथांग जनगसागर लोटूनही कोणतेही मोठे विघ्न येऊ न देता हा उत्सव पार पडतो. याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी महापालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने आॅनलाइन बुकिंग सुरू केल्याची माहिती डी.प्रभाग समितीचे अध्यक्ष अतुल शाह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
>प्रवेशद्वार वाढविले
प्रवेशद्वारातून चौपाटीवर जाण्याचा मार्ग ८० चौरस मीटर रुंदीचा होता. या वर्षी प्रवेशद्वार १० मीटरने वाढण्यात आला आहे.
४० मीटरच्या मार्गिका आता ४५ मीटर लांबीच्या करण्यासाठी पोलीस व महापालिकांचे सर्व मंडप मागच्या बाजूला सरकविण्यात आले आहेत.
>भव्य शामियाना
प्रवेशद्वारांच्या सुरुवातीलाच व्हीआयपी वातानुकूलित शामियाना उभारण्यात आला आहे. या वर्षी शामियानाचा ४० मीटर लांब आणि ७ मीटर रुंदीचा परिसर हा वातानुकूलित केला आहे. यात तीनशे परदेशी पर्यटक उपस्थित राहून गणेश विसर्जन पाहू शकतील.चौपाटीवरून मोठ्या गणेशमूर्तींच्या ट्रॉली, ट्रक समुद्रातील वाळूतून पुढे नेण्यासाठी दरवर्षी स्टील प्लेट टाकल्या जातात. यंदा समुद्रातील ४ हजार ५०० चौरस मीटरचा परिसरात स्टील प्लेट टाकण्यात आल्या असून, यासाठी ४७० स्टील प्लेटचा वापर केला आहे.

Web Title: 300 foreign tourists to come for immersion ceremony!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.