'जयंत पाटील यांच्यासारखा सुसंस्कृत नेता मुख्यमंत्री व्हावा'; अमोल कोल्हेंचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 09:26 AM2023-04-27T09:26:30+5:302023-04-27T10:14:31+5:30
गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री पदावरुन चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री पदावरुन चर्चा रंगल्याची दिसत आहेत.
मुंबई- गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री पदावरुन चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री पदावरुन चर्चा रंगल्याची दिसत आहेत. काल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री पदाचे पोस्टर लागले होते. तर आता दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी 'जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे, असं वक्तव्य केलं आहे. यावरुन आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
'जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. ते सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री बदलाबाबत मला माहीत नाही; शरद पवारांची गुगली
सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना अमोल कोल्हे यांनी हे विधान केलं आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्रीपदा संदर्भात चर्चा सुरू आहे. काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्री पदावर बसण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर राज्यभरात अजित पवार यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर काल अमोल कोल्हे यांनी हे वक्तव्य केलं, त्यामुळे राजकीय चर्चां सुरू आहेत.
अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होणार या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. काल धाराशिव जिल्ह्यातील तेर गावा मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील चौका चौकात तेरचे जावई ,आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. तसेच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे घातले. काल सकाळी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. अजित पवार यांच्या सासरवाडीत झळकलेल्या या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली.