मोदी सरकार घाबरल्यानेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई, नाना पटोले यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 02:55 PM2023-03-23T14:55:25+5:302023-03-23T14:56:44+5:30

भाजपा सरकारच्या दडपशाहीविरोधात राज्यभर जेल भरो आंदोलन, नाना पटोले यांचं वक्तव्य.

Action against Rahul Gandhi only because Modi government is scared Nana Patole alleges narendra modi | मोदी सरकार घाबरल्यानेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई, नाना पटोले यांचा आरोप

मोदी सरकार घाबरल्यानेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई, नाना पटोले यांचा आरोप

googlenewsNext

"काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत नीरव मोदी, ललित मोदीसारख्या भ्रष्ट लोकांविषयी एक भूमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे. तसेच मोदी सरकार राहुल गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले असून त्या भीतीपोटीच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविरोधात काँग्रेस पक्षाने मुंबईत जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणजितसिंग सप्रा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, "जनतेचे पैसे घेऊन पळालेल्यांवर राहुलजी गांधी यांनी भूमिका घेतली तर त्यांच्यावर खोटे आरोप लावून दबावाखाली कारवाई करण्यात आली. दबावाखाली होत असलेल्या कारवाईचा काँग्रेसने निषेध केला आहे. ललित मोदी व निरव मोदी यांच्याबद्दल बोलल्यानंतर जर शिक्षा होत असेल तर काँग्रेस पक्ष राज्यभर जेल भरो आंदोलन करुन त्याचा निषेध करेल. सावरकर यांच्याबद्ल काँग्रेसने आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु विरोधी पक्ष जाणीवपूर्वक राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे."

"काँग्रेस पक्षाचा देशभर वाढता प्रभाव पाहता केंद्रातील सत्ताधारी पक्ष घाबरलेला आहे. या परिस्थितीतूनच विरोधकांवर कारवाई केली आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या दबावतंत्राविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून काँग्रेसने हे आंदोलन केले आहे," असे माजी मुख्यमंत्री अशोख चव्हाण यावेळी म्हणाले.

Web Title: Action against Rahul Gandhi only because Modi government is scared Nana Patole alleges narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.