‘ती’ एजन्सी माहिती खात्याने निवडली होती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 04:34 AM2020-07-26T04:34:38+5:302020-07-26T04:34:57+5:30
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती । काँग्रेसची चौकशीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निवडणूक जनजागृती मोहीम राबवण्यासाठी राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाने (डीजीआयपीआर) ज्या एजन्सीची निवड केली होती त्याच एजन्सीकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी काम दिल्यामुळे होणाºया आरोपांचा आणि निवडणूक अधिकाºयांचा काहीही संबंध नाही, असा खुलासा करत राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सगळी जबाबदारी माहिती खात्यावर ढकलली आहे.
राजकीय विचाराधारा असलेल्या संस्थेला मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काम दिल्याचे सूचित करणे हे दिशाभूल करणारे आणि चुकीचे आहे, असे महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्र्यालयाने स्पष्ट केले आहे.
प्रचलित प्रथेनुसार महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने निवड केलेल्या संस्थेकडून मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली आणि प्रचलित नियम आणि विहीत प्रक्रियेनुसार महासंचालनालयाने जनजागृतीसाठी योग्य संस्थेची निवड केली. संस्थेची निवड मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय करीत नाही. यासंदर्भात साकेत गोखले यांच्या टिष्ट्वटमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांसंदर्भातील वस्तुस्थिती भारत निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.
दरम्यान, यासंदर्भात काही लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या निवेदनांचीही योग्य दखल घेण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर अहवाल लवकरच आयोगाकडे पाठविण्यात येईल असेही, त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या अडीच वर्षात नियामक मंडळाच्या
माहिती खात्याच्या पाच वर्षांतील कामाची समिती नेमून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तर २०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडियावरील फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाºयाची असल्याचे समोर आले आहे.
संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणे अपेक्षित आहे. परंतु सदर प्रकार लोकशाहीमधील मुलभूत तत्त्वांना धक्का पोहोचवणारा आहे, असा गंभीर आक्षेप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.