"आम्ही साहेबांच्या विचारांच्या विरोधात नाही, पण आम्हाला बोलायला लावलंत तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 01:52 PM2023-07-05T13:52:24+5:302023-07-05T13:53:38+5:30
"तेव्हा माझा राजीनामा घेतला गेला... ते सारं का घडलं?" रूपाली चाकणकरांचा आक्रमक पवित्रा
Rupali Chakankar NCP, Ajit Pawar vs Sharad Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. अजित पवार ४० पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन शरद पवारांना सोडून पुढे निघाले. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. तसेच, खरी राष्ट्रवादी आमचीच असा दावाही केला. त्यानंतर आज अजित पवार गटाचा मेळावा झाला. त्यात महिला अध्यक्ष म्हणून रूपाली चाकणकर यांनी आपली रोखठोक मतं मांडली. त्याच वेळी, त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारण, पदनियुक्त्या आणि त्यांच्या मनात असलेली सल बोलून दाखवली.
"मनगटाच्या ताकदीइतकाच रोखठोक निर्णय घेणारे अजित पवार यांच्या मंचावर मी पहिल्यांदाच महिला अध्यक्ष म्हणून भाषण करत आहे. 'तुझीच सांथसंगत हवी, आपलंच आभाळ आपली धरती... चालत राहू असेच सारे, वादळ घेऊन खांद्यावरती' अशी आम्हा सर्वांची भावना आहे. दादा, आम्ही तुमच्या विकासाच्या निर्णयाच्या सोबत आहोत. आपल्याकडे आलो आणि काम झालं नाही कधीही कार्यकर्त्यांचं होत नाही. सांगतो, बघतो असं कधीही होत नाही. इथला प्रत्येक कार्यकर्ता दादांकडून ऊर्जा घेऊन जाणार आहे. वादळ असो किंवा कोरोना असो, महाराष्ट्राचा माणूस एकत्र लढतो. कोरोनामध्ये अजितदादा एकटे असे मंत्री होते जे मंत्रालयापासून सर्व ठिकाणी सर्वत्र जनतेसाठी उपस्थित होतात", असे रूपाली चाकणकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
"रूपाली चाकणकर इथे कशी असं विचारतात? मला ओळख शरद पवार यांनी दिली. त्यांच्या विरोधात कोणतीही भूमिका नाही. पण याचा अर्थ असा नाही की जे साहेबांच्या सोबत आहेत त्यांच्याविरोधात नाही. तुम्ही आम्हाला बोलायला लावलं तर आमच्या शब्दांनाही तलवारीची धार आहे. मी अडीच वर्ष महिला अध्यक्ष म्हणून काम करता आलं. त्याचीच पावती मिळाली आणि मला आयोगाचे अध्यक्षपद मिळाले. पण नंतर माझा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला गेला. रस्त्यावर काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला १५ महिने पक्षाच्या व्यासपीठावरून दूर का ठेवले, ही माझी सल होती. ती सल १५ महिने मनात होती. पण व्यासपीठावर १५ महिन्यांनी आले. मला खूप बरं वाटलं. तुम्ही मला पुन्ही ती संधी दिलीत," अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांचे आभार मानले.
रख हौसला वो मंजर भी आएगा...
प्यासे के पास चलकर, समंदर भी आएगा ||
थक कर बैठे ना मंजिल के मुसाफिर...
वो मंजिल भी आएगी और मजा भी आएगा ||
या शायरीसह त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.