"...म्हणून राष्ट्रवादीचे आमदार पवारांवर नाराज", पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीनंतर खलबतं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 03:03 PM2023-07-02T15:03:41+5:302023-07-02T15:04:08+5:30
अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मोठा गट सरकारमध्ये सामील झाला आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप केला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे जवळपास ४० आमदार त्यांनी फोडले असून राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत ९ आमदार मंत्री झाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एवढा मोठ गट बाहेर पडण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, बिहारची राजधानी पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या काही आमदारांमध्ये नाराजीचा सूर होता. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमवेत राजभवनात गेलेले काही आमदार शरद पवार यांच्या पाटणा येथील विरोधी एकता बैठकीत राहुल गांधींसोबत स्टेज आणि मित्रमंडळ शेअर करण्याच्या एकतर्फी निर्णयामुळे खूप नाराज होते.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमवेत राजभवनात गेलेले काही आमदार शरद पवार यांच्या पाटणा येथील विरोधी एकता बैठकीत राहुल गांधींसोबत स्टेज आणि मित्रमंडळ शेअर करण्याच्या “एकतर्फी” निर्णयामुळे “खूप नाराज” होते: सूत्रांनी सांगितले.
Some MLAs accompanying NCP leader Ajit Pawar to Raj Bhawan were “upset” with Sharad Pawar’s “unilateral” decision to share stage and ally with Rahul Gandhi at the opposition unity meet in Patna: Sources pic.twitter.com/YGc7eKd95V
— ANI (@ANI) July 2, 2023
मंत्री झालेल्या आमदारांची नावे
- अजित पवार
- छगन भुजबळ
- दिलीप वळसे पाटील
- हसन मुश्रिफ
- धनंजय मुंडे
- धर्मरावबाबा आत्राम
- आदिती तटकरे
- संजय बनसोडे
- अनिल पाटील
दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.