अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राष्ट्रवादीतील इतर नेत्यांचीही मंत्रीपदी वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 02:35 PM2023-07-02T14:35:44+5:302023-07-02T14:35:57+5:30
अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
मुंबई : अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप केला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे जवळपास ४० आमदार त्यांनी फोडले असून राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत ९ आमदार मंत्री झाले आहेत. त्यांची नावे देखील समोर आली आहेत.
नावे खालील प्रमाणे...
- अजित पवार
- छगन भुजबळ
- दिलीप वळसे पाटील
- हसन मुश्रिफ
- धनंजय मुंडे
- धर्मरावबाबा आत्राम
- आदिती तटकरे
- संजय बनसोडे
- अनिल पाटील
#WATCH | NCP leader Ajit Pawar takes oath as Maharashtra Deputy CM in the presence of CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis pic.twitter.com/3l3p1Fi9nB
— ANI (@ANI) July 2, 2023
दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.