अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांची दोन शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 10:59 AM2024-07-22T10:59:19+5:302024-07-22T11:01:04+5:30

Ajit Pawar: काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Ajit Pawar reacts to Amit Shah's criticism of Sharad Pawar | अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांची दोन शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले...

अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांची दोन शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले...

Ajit Pawar: काल पुण्यात भाजपाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली, या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती. यावेळी अमित शाह यांनी खासदार शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. 'भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं आहे अशी टीका अमित शाह यांनी केली. यावर आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

"शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; अमित शाहांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "तुम्ही आधी ठरवा..."

आज पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारली, यावेळी अजित पवार यांनी नो केमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळले आहे.

खासदार सुप्रिया सुळेंनी दिले प्रत्युत्तर

"आज भाजपचे लोक ज्याला एनडीए सरकार म्हणतात, ते काही महिन्यांपूर्वी मोदी सरकार होतं. याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यामुळे शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं. अमित शाह हे त्याच सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, हे सर्व ते विसरले असतील, त्यामुळे त्यांनी टीका केली,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

"भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते नेते आज महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. अमित शाहांच्या कार्यक्रमात ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप होते ते अशोक चव्हाण यांच्या मागे बसले होते, महाराष्ट्रच नाही, तर त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारपर्यंत ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले. ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यापैकी ९० टक्के लोक आज भाजपमध्ये आहेत ते वॉशिंग मशीनमुळे," असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

केंद्रीय मंत्री अमित शहांची टीका काय?

यावेळी बोलताना अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे, असं अमित शाह म्हणाले.  "जेव्हा जेव्हा राज्यात भाजपाची सत्ता आली तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे. जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जाते. २०१४ ला भाजपा सत्तेत आली मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले तेव्हा मराठा आरक्षण गेलं. त्यामुळे आता तुम्ही ठरवा काय करायचं ते," असेही अमित शाह म्हणाले.

Web Title: Ajit Pawar reacts to Amit Shah's criticism of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.