"अजित पवारांनी तो GR दाखवावा"; NCP च्या एकनाथ खडसेंचं प्रतिचॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 10:53 PM2023-09-04T22:53:27+5:302023-09-04T23:09:52+5:30

मी संपूर्ण मराठा समाजाला सांगतो की, काही जणांना विनाकारण बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Ajit Pawar should show that GR; Answer by Eknath Khadse of NCP | "अजित पवारांनी तो GR दाखवावा"; NCP च्या एकनाथ खडसेंचं प्रतिचॅलेंज

"अजित पवारांनी तो GR दाखवावा"; NCP च्या एकनाथ खडसेंचं प्रतिचॅलेंज

googlenewsNext

मुंबई - जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याने जनप्रक्षोभ उसळलेला आहे. दरम्यान हा बेछूट लाठीमार वरून, मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार झाल्याची शंका आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला होता. त्याला आता अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. वरून आदेश आले आहेत, असं काहीजण खुशाल सांगताहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू, राजकारण सोडून देऊ, असं आव्हान अजित पवार यांनी दिलं आहे. त्यावर, आता राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना प्रतिसवाल केला आहे. 

मी संपूर्ण मराठा समाजाला सांगतो की, काही जणांना विनाकारण बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरून आदेश आले आहेत, असं काहीजण खुशाल सांगताहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू. चला दुध का दूध पाणी का पाणी. आम्ही कोणी तिघांनी आदेश दिले असतील ना, तर सिद्ध करावं. आम्ही राजकारणातून बाजूला होऊ. त्याचवेळी देवेंद्र फडणवीसांनी हात वर करुन बोट उंचावत ''एस''... म्हणत अजित पवारांचं समर्थन केलं. आता, अजित पवारांच्या चॅलेंजवर एकनाथ खडसेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, उपमुख्यमंत्री म्हणून काय विशेषाधिकार आहेत, याचा जीआर दाखवा, असे चॅलेंच अजित पवारांना दिले आहेत.

तुम्ही जीआर दाखवा

अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सगळे अधिकार आहेत हे त्यांनी सिद्ध करुन दाखवावे. उपमुख्यमंत्री हे नामाभिधान असते, त्यांना कुठलाही विशेषाधिकार उपमुख्यमंत्री म्हणून नसतो. मग हे सांगताना मला विशेषाधिकार आहे, असा एखादा जीआर त्यांनी दाखवावा. तसं, एखाद्या ठिकाणी लाठीचार्ज करत असताना एकनाथ खडसेंनी आदेश दिला म्हणून लाठीचार्ज होईल का? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. 

मग तो वरिष्ठ कोण?

तेथील एसपींनी पहिल्याच भेटीत सांगितलं की, लाठीचार्ज करायच्या सूचना मला वरिष्ठांकडून मिळाल्या. मग हा वरिष्ठ कोण असू शकतो, त्यांच्यापेक्षा जो वरिष्ठ आहे तोच असू शकतो. एखादी घटना घडली तर त्याची अंतिमत: जबाबदारी ही गृह खात्यावर असते, गृहखात्याच्या मंत्र्यावर असते. रेल्वेचा अपघात झाला तर रेल्वेमंत्री राजीनामा, गोवारीचं हत्याकांड झालं तर मंत्र्याचा राजीनामा. मग, इथं लाठीचार्ज करण्यासाठी मी जबाबदार नाही असं म्हणण योग्य नाही, ती त्यांचीच जबाबदारी आहे. दरम्यान, मी राजीनामा मागणार नाही. कारण, मी मागितल्यावर देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील, असं वाटत नाही, असेही खडसेंनी म्हटले.

Web Title: Ajit Pawar should show that GR; Answer by Eknath Khadse of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.