Ajit Pawar: 'वंदे मातरम' बोलूच पण आधी महागाईवर बोला, नको ते विषय कशाला आणता?; अधिवेशनाआधी अजित पवार कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 04:23 PM2022-08-16T16:23:38+5:302022-08-16T16:25:05+5:30

राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Ajit Pawar slams cm eknath shinde and devendra fadnavis before the state monsoon session | Ajit Pawar: 'वंदे मातरम' बोलूच पण आधी महागाईवर बोला, नको ते विषय कशाला आणता?; अधिवेशनाआधी अजित पवार कडाडले

Ajit Pawar: 'वंदे मातरम' बोलूच पण आधी महागाईवर बोला, नको ते विषय कशाला आणता?; अधिवेशनाआधी अजित पवार कडाडले

Next

मुंबई-

राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. पण मूळात हे सरकारचं लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवून अस्तित्वात आलेलं सरकार आहे. त्यामुळे शिंदे सरकार हे विधीमान्य सरकार आहे. आम्ही अधिवेशनाआधीच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे", असं अजित पवार म्हणाले. तसंच सत्ताधाऱ्यांकडून राज्यातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात असून नको त्या विषयांना महत्व दिलं जात असल्याचंही ते म्हणाले. 

"राज्यात पावसाचा जोर आहे. आधीच जवळपास १५ लाख हेक्टर शेतजमीन अतिवृष्टीनं बाधित झालेली आहे. त्यांनाच अद्याप मदत मिळालेली नाही. त्यात आजही पाऊस सुरू आहे. त्यामुळे बाधित जमिनीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. पण त्यानंतरही मदत झालेली नाही. विरोधी पक्ष सरकारच्या कामावर अजिबात समाधानी नाही. शिंदेंनी मदतीची घोषणा करताना एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत देत असल्याचं जाहीर केल. पण आम्हीही इतकी वर्ष काम करतोय आम्हालाही माहित्येय की मूळातच एनडीआरएफचे निकष कालसुसंगत नाहीत. आम्हीही याआधी एनडीआरएफच्या निकषांपेक्षा तिप्पट मदत जाहीर केली आहे. त्यामुळे सरकारकडून केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत आहे", असं अजित पवार म्हणाले. 

'वंदे मातरम' म्हणण्याच्या वादावरही दिली प्रतिक्रिया
राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर हॅलोऐवजी आता वंदे मातरम बोलावं यासंदर्भात केलेल्या विधानाचाही अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला. "महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत. आता कुणी कुणाला भेटल्यावर जय हिंद म्हणतो, कुणी जय हरी म्हणतो. आता मध्येच काय यांनी वंदे मातरम काढलं. आमचा वंदे मातरम म्हणण्याला विरोध नाही. पण हा विषय सध्या महत्वाचा आहे का? महागाईवर बोला, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावला आहे त्याचं काय करणार आहात? यावर बोलायला हवं", असं अजित पवार म्हणाले. 

Web Title: Ajit Pawar slams cm eknath shinde and devendra fadnavis before the state monsoon session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.