अजित पवारांनी मोदी-शहांना उल्लू बनवलं; आंबेडकरांनी सांगितलं दादांचं घुमजाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 10:27 AM2023-05-10T10:27:04+5:302023-05-10T10:28:09+5:30

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती

Ajit Pawar turned Modi-Shah into an owl; Prakash Ambedkar told Dada's Ghumjava | अजित पवारांनी मोदी-शहांना उल्लू बनवलं; आंबेडकरांनी सांगितलं दादांचं घुमजाव

अजित पवारांनी मोदी-शहांना उल्लू बनवलं; आंबेडकरांनी सांगितलं दादांचं घुमजाव

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारभाजपात जाणार असल्याच्या चर्चांनी काही दिवसांपूर्वी जोर धरला होता. त्यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर ईडीचा दबाव असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे, अजित पवारभाजपात जातील अशी मोठी चर्चा रंगली होती. मात्र, मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र, पहाटेच्या शपथविधीपासून अजित पवार यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा असल्याचं अनेकदा माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात येतं. आता, यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाष्य केलंय. तसेच, अजित पवारांनी दोनवेळा भाजपची फसवणूक केल्याचंही त्यांनी म्हटलं. 

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला, तसेच अजित पवार यांच्या विश्वासर्हतेवरही अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी, अजित पवारांनी परखडपणे भूमिका मांडत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलं. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी आपला निर्णय बदलला, तसेच राजीनामा माघारी घेत, राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम असल्याचं जाहीर केलं. 

या घटनेवरुन अनेकांनी अजित पवारांना लक्ष्य केलं. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही त्यांच्यावर टीका केली. आता, प्रकाश आंबडेकर यांनीही अजित पवारांनी मोदी-शहांना फसवल्याचं म्हटलंय. ''अजित पवारांनी दोनवेळा भाजपसोबत जाण्यासाठी जुळवाजुवळ केली होती. मोदी-शहांनी देखील विधान केलं, दोन्हीवेळा केलं. पण, दोन्ही वेळा अजित पवारांनी घुमजाव केलं. आता, या घुमजाव करणाऱ्यांना तुम्ही माननार काय?. अजित पवारांनी मोदी-शहांना उल्लू बनवलंय,'' असे म्हणत प्रकाश आंबडेकर यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. तर, भाजप नेत्यांवरही अप्रत्यक्षपणे टीका केलीय.

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढील २ ते ३ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात, शिंदे सरकार कोसळेल आणि भाजपला पर्याय म्हणून अजित पवार सोबत हवे आहेत, असा राजकीय अंदाज बांधला जात आहे. त्यातूनच, अजित पवारांनी पुन्हा एकदा भाजपसोबत जुळवणी करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. 

Web Title: Ajit Pawar turned Modi-Shah into an owl; Prakash Ambedkar told Dada's Ghumjava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.