तीन पक्षांच्या सरकारबाबत अजित पवारच होते साशंक!

By अतुल कुलकर्णी | Published: August 22, 2020 03:05 AM2020-08-22T03:05:57+5:302020-08-22T07:09:29+5:30

अजितदादांनी भाजपसोबत जायला नको होते, असेही ते म्हणाले.

Ajit Pawar was skeptical about the three-party government! | तीन पक्षांच्या सरकारबाबत अजित पवारच होते साशंक!

तीन पक्षांच्या सरकारबाबत अजित पवारच होते साशंक!

googlenewsNext

अतुल कुलकर्णी
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी नेहरू सेंटरवर झालेल्या बैठकीत खातेवाटपावरून झालेली तणातणी पाहून अजित पवार नाराज होते. अशी रस्सीखेच असेल तर हे सरकार टिकणार कसे? अशी शंका त्यांना होती, त्यामुळेच ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले, असा गौप्यस्फोट राष्टÑवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी केला. अजितदादांनी भाजपसोबत जायला नको होते, असेही ते म्हणाले.
हे सरकार स्थापन करतेवेळी ‘जे घडले’ व त्यानंतर आमचा जो काही संवाद झाला, त्यांनी जी भावना व्यक्त केली ते सगळं आत्ता उघड करता येणार नाही. पण ती त्यांची ती एक भूमिका होती. पण पुढे सगळे प्रश्न सुटले आणि आता तर आमचे सरकार व्यवस्थीत चालू आहे, असे खा. पटेल म्हणाले.
तुम्ही परवा म्हणालात की, आम्हीच आता मोठे काँग्रेसचे भाऊ आहोत. हे विधान तुमच्या संबंधांना अडचणीत आणत नाहीत का?
मी नागपूरला जे बोललो त्यावर ठाम आहे. नागपूरच्या विधानसभेच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो. दुर्दैवाने काँग्रेसनी आम्हाला आधी होकार दिला आणि शेवटच्या दिवसापर्यंत टाळले. म्हणून मी म्हणालो की, आता तर आमचे सदस्य जास्त आहेत. त्यामुळे आता तुम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत राहू शकत नाही. विदर्भात तुम्ही असाल पण भविष्यात आम्ही ही परिस्थिती बदलू शकतो. माझ्या या विधानामुळे नाराजी वगैरे काही होणार नाही. तीन पक्षांची एक समन्वय समिती आहे. आतापर्यंत कोणताही मोठा वाद निर्माण झाला नाही.
पार्थ पवारच्या भूमिकेवरून उठलेले वादळ शमले का?
पटेल: पार्थ जरी अजित पवार यांचा मुलगा असला तरी राष्ट्रवादीत पार्थची काहीही भूमिका नाही. विनाकारण त्यांना एवढे महत्त्व देऊन, त्याच्या टष्ट्वीटला महत्त्व देणे मला आवश्यक वाटत नाही. तरुण मुले टष्ट्वीटर व फेसबुकवर काहीही बोलतात. आमच्यादृष्टीने पार्थ प्रकरणावर पडदा पडला आहे.
>सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरे
यांना लक्ष्य करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव आहे का?
हे सगळे ‘रीड बिट्वीन द लाईन्स’ आहे. आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात काहीही संबंध नाही. आदित्य कधी त्या सुशांत सिंग राजपूतच्या घरी गेला होता? भेटीगाठीचे संबंध तरी होते का, तर तसे काहीही नव्हते. आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करणे दुर्देवी आहे.

Web Title: Ajit Pawar was skeptical about the three-party government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.