अजित पवार यांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 08:16 PM2021-11-01T20:16:12+5:302021-11-01T21:12:25+5:30

Kirit Somaiya's serious Allegaions Against Ajit Pawar : पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली आहे. 

Ajit Pawar's son-in-law Mohan Patil's crore financial transactions; Allegation of Kirit Somaiya | अजित पवार यांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा आरोप

अजित पवार यांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा आरोप

Next

ठाकरे सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आर्थिक व्यवहार, उलाढाल आश्चर्य उत्पन्न करणारी आहे. तसेच पवारांचे मित्र, बिल्डरांकडून अजित पवार आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची (शंभरहून अधिक) अपारदर्शक नामी आणि बेनामी आवक असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.मोहन पवार हे जरंडेश्वर साखर कारखान्याचे एक मालक आहेत. पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली आहे. 

अजित पवार (स्वत:), त्यांची पत्नी सुनेत्रा अजित पवार,  मुलगा पार्थ अजित पवार, आई आशाताई अनंतराव पवार, बहीण विजया मोहन पाटील, जावई मोहन पाटील, बहीण नीता पाटील यांच्या बँक खात्यात ही बेनामी आवक आल्याचे व्यवहार आढळून आले आहेत. तसेच गेली १९ दिवस आयकर आणि आता ईडीचे धाडसत्र आणि शोध ऑपरेशन(सर्च) सुरु आहेत. १ हजार ५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती समोर आली आहे, त्याचबरोबर १८४ कोटी रुपयांची रोकड, दागिने (ज्वेलरी), आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र इ. इन्कम टॅक्सच्या हाती लागले असल्याचे ट्विटद्वारे माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. 

त्याचप्रमाणे जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड साखर कारखाना, श्री. अंबालिका शुगर प्रा. लि. व अन्य कंपन्यांचे आर्थिक व्यवहार झाले असून अजित पवार परिवाराच्या, समूहाच्या विभिन्न कंपन्यांच्या बरोबर केलेली हेराफेरी समोर येत आहे.



i. गुरु कमोडिटी सर्विसेस प्रा. लि.
ii. स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि.
iii. फायर पॉवर मार्केटिंग (इंडिया) प्रा. लि.
iv. नॉन-कॉन एनर्जीज (इंडिया) प्रा. लि.
v. आर्या अॅग्रो बायो अॅण्ड हर्बल्स प्रा. लि.
vi. जय अॅग्रोटेक प्रा. लि.
vii. कल्प वृक्षा प्रमोटर्स प्रा. लि.
viii. सूर्यकिरण अॅग्रो इस्टेट्स प्रा. लि.
ix. ओंकार रिअल्टर्स अॅण्ड डेव्हलपर्स
x. शिवालिक बिल्डर्स प्रा. लि.
xi. ओंकार रिअल्टर्स प्रा. लि.
xii. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि.
xiii. गूफी ग्राफिक्स प्रा. लि.
xiv. गोयल गंगा इस्टेट अॅण्ड प्रॉपर्टीस प्रा. लि.

वरील अनेक डझन कंपन्यांचा आर्थिक व्यवहाराअंतर्गत ट्रान्सफर केलेले पैसे बेनामी असून संपत्ती आणि  मनी लॉंड्रीगसाठी कंपनीची लेयर / शिडी तयार करणं, करोडो रूपयांची हेराफेरी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नामी-बेनामी संपत्तीसाठी पवार परिवाराचे जावई मोहन पाटील यांचा ही उपयोग केलेला दिसत आहे. ईडी आणि आयकरची चौकशी चालू आहे.             

 

 

Web Title: Ajit Pawar's son-in-law Mohan Patil's crore financial transactions; Allegation of Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.