अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार मंत्री शंभुराज देसाईंच्या भेटीला; राजकीय चर्चांणा उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 12:36 PM2023-01-19T12:36:14+5:302023-01-19T12:43:25+5:30
गेल्या काही दिवसापासून शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
गेल्या काही दिवसापासून शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही हिवाळी अधिवेशनात शिंदे गटातील मंत्र्यांवर घोटाळ्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी केली होती, दरम्यान आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. यावरुन आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मंत्री शंभुराज देसाई यांच्या भेटीसाठी का गेले आहेत, याचे कारण अजुनही समोर आलेले नाही. पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणुकही लढली आहे. दरम्यान, २०१९ च्या सरकार स्थापनेवेळीही पार्थ पवार चर्चेत होते.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ती' घोषणा केल्यास आम्हाला आनंद होईल'; संजय राऊतांचं विधान
सध्या राज्यात शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत, तर दुसरीकडे पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची चर्चा सध्या सुरू आहे, या पार्श्वभूमिवर पार्थ पवार यांनी शंभुराज देसाई यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पार्थ पवार हे अस्वस्थ आहेत. त्यांचे बंधु विधानसभा सदस्य तर मुंबई क्रिकेटचेही अध्यक्ष आहेत. त्यामुळे पार्थ पवार अस्वस्थ आहेत, यासाठी त्यांनी शंभुराज देसाई यांची भेट घेतली असेल, ते राजकीय स्थीरता मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतील, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.