आंबेडकर यांच्या मनधरणीचे प्रयत्न; महाआघाडीसाठी काँग्रेस अद्यापही प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 11:31 PM2018-09-18T23:31:45+5:302018-09-19T06:53:19+5:30

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आंबेडकर यांनी महाआघाडीत यावे, असे आवाहन काँग्रेस नेत्यांकडून केले जात आहेत.

Ambedkar's concerted efforts; Congress is still trying to make a big deal | आंबेडकर यांच्या मनधरणीचे प्रयत्न; महाआघाडीसाठी काँग्रेस अद्यापही प्रयत्नशील

आंबेडकर यांच्या मनधरणीचे प्रयत्न; महाआघाडीसाठी काँग्रेस अद्यापही प्रयत्नशील

Next

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते अद्यापही प्रयत्नशील आहेत. जागा वाटपाबाबत सकारात्मक विचार केला जाईल. मात्र, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आंबेडकर यांनी महाआघाडीत यावे, असे आवाहन काँग्रेस नेत्यांकडून केले जात आहेत.

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमने आघाडीची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे आंबेडकरांच्या संपर्कात आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समविचारी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

समन्वय समितीच्या माध्यमातून संपर्क
काँग्रेस-राष्टÑवादीच्या समन्वय समितीच्या माध्यमातून विविध पक्ष नेत्यांशी आघाडीचे नेते चर्चा करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, भारिपचे प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सहभागी झाले तरच बळ वाढणार आहे.

Web Title: Ambedkar's concerted efforts; Congress is still trying to make a big deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.