... अन् अमोल कोल्हेंचा आवाज नाकारला? खासदारांने व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 03:40 PM2023-03-27T15:40:34+5:302023-03-27T15:42:13+5:30
मराठी कलाकारांनी राजकारणात याव का?, मला हा प्रश्न का पडला असावा आणि याचं उत्तर मी तुमच्याकडे का मागतोय
मुंबई - अभिनेता आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घडलेल्या प्रसंगाबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. कलाकार आणि राजकीय नेता म्हणून आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सर्वांचाच वेगळा असायला हवा, दोन्हीमध्ये एक विचार करुन जाणीवपूर्वक गल्लत करता कामा नये. असं असे तर, मग मराठी कलाकारांनी राजकारणात यावं का, असा सवालच खासदार कोल्हे यांनी विचारला आहे. कोल्हे यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये, आपणास एका कार्यक्रमासाठी आवाज देण्याला केवळ राजकीय नेता असल्यानेच नाकारण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.
मराठी कलाकारांनी राजकारणात याव का?, मला हा प्रश्न का पडला असावा आणि याचं उत्तर मी तुमच्याकडे का मागतोय, हे जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ पाहा आणि मला कमेंटमध्ये कळवा, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, रायगडावर होणाऱ्या एका कार्यक्रमाचा दाखला त्यांनी दिलाय. ज्या कार्यक्रमासाठी त्यांना अगोदर आवाज देण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. मात्र, सरकारी कार्यक्रमा असल्याने, माझा आवाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला सूट होत नसल्याचे कारण देत मला टाळण्यात आले, असे अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.
मराठी कलाकारांनी राजकारणात यावं❓
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 27, 2023
काय वाटतं तुम्हाला❓
मला हा प्रश्न का पडला असावा आणि याचं उत्तर मी तुमच्याकडे का मागतोय, हे जाणून घेण्यासाठी #AmolTeAnmol या आपल्या #YT चॅनेल वरील व्हिडीओ आवर्जून पहा आणि हो तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका!#YTLink ~ https://t.co/fwtg7pSy2Rpic.twitter.com/T1JgECbIqC
''रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक लाइट अॅन्ड म्युझिक शो होणार होता. तेव्हा शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेला आवाज द्याल का अशी मला विचारणा झाली. महाराजांचे काम असल्यामुळे मी मागचा-पुढचा कोणताच विचार न करता हो म्हटलं. मानधनही जे बंद पाकिटात द्याल ते आनंदाने स्विकारेन असं सांगितलं. मात्र, कार्यक्रमाच्या ५ ते ६ दिवस अगोदर मला या कार्यक्रमासाठी संयोजकांकडून नकार देण्यात आला. तुमचा आवाज महाराजांच्या व्यक्तीरेखेसाठी सूट होत नाही, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज साकारण्याचा १६ वर्षांचा दांडगा अनुभव पाठिशी असतानाही राजकीय हेतुपुरस्कृत अशाप्रकारे डावलले जात असल्याचा आरोप कोल्हे यांनी केलाय. तसेच, मी राजकारणात आहे हा माझा गुन्हा आहे का? असा सवालही त्यांनी केलाय.