अण्णासाहेब पाटील महामंडळही पवारांकडे; राज्य सरकारने काढला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 12:45 AM2020-11-13T00:45:12+5:302020-11-13T07:02:07+5:30

सारथीचा कारभार आधी बहुजन कल्याण विभागाकडे होता.

Annasaheb Patil Mahamandal also to deputy cm Ajit Pawar | अण्णासाहेब पाटील महामंडळही पवारांकडे; राज्य सरकारने काढला आदेश

अण्णासाहेब पाटील महामंडळही पवारांकडे; राज्य सरकारने काढला आदेश

Next

मुंबई : मराठा समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत सारथी या संस्थेपाठोपाठ आता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचा कारभारही उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे सोपविण्यात आला आहे. या संबंधीचा आदेश गुरुवारी काढण्यात आला.

सारथीचा कारभार आधी बहुजन कल्याण विभागाकडे होता. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे या विभागाचे मंत्री आहेत. मध्यंतरी सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याच्या मागणीवरून आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर सारथीचा कारभार नियोजन विभागाकडे सोपविण्यात आला. वित्त व नियोजन विभाग अजित पवार यांच्याकडे आहे.

तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारने नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेत असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवावे, अशी मागणी केल्याने आपल्याला महामंडळावरून हटविण्यात आल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता.
आतापर्यंत या महामंडळाचा कारभार कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या अखत्यारित होता. हा विभाग राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्याकडे आहे.

Web Title: Annasaheb Patil Mahamandal also to deputy cm Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.