अर्णब गोस्वामींचा आजही कारागृहातच मुक्काम, जामीन अर्जावर उद्या सुनावणी
By महेश गलांडे | Published: November 6, 2020 06:51 PM2020-11-06T18:51:02+5:302020-11-06T18:53:39+5:30
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे.
मुंबई - अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामी यांना आजही उप कारागृहातच मुक्काम करावा लागणार आहे. यापूर्वी जामिनाचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला होता. फिर्यादी आज्ञा नाईक, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना न्यायालयाने बजावली नोटीस. त्यानुसार आज दुपारी ३ वाजता अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलल्यात आली आहे. त्यामुळे, अर्णब यांना आजची रात्रीही तुरुंगातच काढावी लागणार आहे.
Lokmat Exclusive: ना घरचं जेवण, ना मिनरल वॉटर, अर्णब गोस्वामी दोन दिवसांपासून फक्त बिस्किटांवर
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. तर दुसरीकडे अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी मिळावी म्हणून सेशन कोर्टात धाव घेतली होती. मात्र, अर्णब यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यानंतर, अर्णब यांच्या जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी होणार होती. मात्र, युक्तिवाद पूर्ण न झाल्याने न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे, उद्या दुपारी अर्णब यांच्या जामिनावर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याकडे सर्वाचं लक्ष आहे. तसेच, अलिबाग पोलिसांनीही सत्र न्यायालयात याचिका दाखल करुन अर्णब यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे. त्यावरही, उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.
न्यायालयीन सुनावणी पुढे ढकल्यामुळे अर्णब यांना आजही अलिबाग येथील शाळेत तात्पुरत्या स्वरुपात बनविण्यात आलेल्या उप-कारागृहातच रात्र काढावी लागणार आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून त्यांना येथील राहण्याचा त्रास सहन होत नाही. ना घरचं जेवण, ना मिनरल वॉटर.... ना एसीची हवा, झोपायला मोठा बेड... यामुळे अर्णब यांची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते केवळ बिस्किटांवरच आपला दिवस काढत आहेत. तर, कोविडच्या कठोर नियमांमुळे त्यांच्या भेटीसाठीही कोणाला परवानगी देण्यात येत नाही.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक -
सध्या, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगडपोलिसांनी अटक केली आहे. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात, 'अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा ते आज जिवंत असते, असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे.'