Vidhan Parishad Election: "...आघाडीत जो बेबनाव सुरू आहे, त्यामध्ये आम्हाला ओढू नका"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 05:32 PM2020-05-10T17:32:15+5:302020-05-10T17:51:58+5:30
भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट करून आघाडीवर निशाणा साधला आहे.
मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत कुणी किती जागा लढवायचा या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिनविरोध निवडणुकीसाठी आग्रही असताना काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याने मोठा पेच तयार झाला आहे. यातच शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपाला डिवचल्याने या वादात आता भाजपानेही उडी घेतली आहे.
भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट करून आघाडीवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सन्मान आणि राज्यातील परिस्थिती पाहता निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात! ती जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे, असे वक्तव्य आशिष शेलार यांनी केले आहे. याचबरोबर, आम्ही आमच्या मतांप्रमाणे उमेदवार दिले आहेत. काँग्रेस ऐकत नाही यावरून आघाडीत जो बेबनाव सुरू आहे त्यामध्ये आम्हाला ओढू नका, असा टोलाही आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सन्मान आणि राज्यातील परिस्थिती पाहता निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात! ती जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. आम्ही आमच्या मतांप्रमाणे उमेदवार दिले आहेत. काँग्रेस ऐकत नाही यावरून आघाडीत जो बेबनाव सुरु आहे त्यामधे आम्हाला ओढू नका!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 10, 2020
दरम्यान, भाजपा प्रमुख विरोधीपक्ष आहे. तो कालपर्यंत सत्ताधारी होता. निवडणूक बिनविरोध व्हावी ही त्यांचीही तितकीच जबाबदारी आहे. चौथ्या जागेसाठी त्यांच्याकडे मते कमी आहेत. तर त्यांनाही घोडेबाजारातील काही गाढवं विकत घ्यावी लागतील. हे चित्र कोरोनाच्या परिस्थिती योग्य नाही. त्यांनी देखील कोरोनाच्या या स्थितीत महाराष्ट्रावर ही निवडणूक लादायची का हा विचार केला पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
आणखी बातम्या...
भारत-चीन सैनिकांमध्ये संघर्ष, सीमेवर काहीकाळ तणावाची परिस्थिती
CoronaVirus : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बराक ओबामा भडकले; फोन कॉल लीक
पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाल